नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
भारतीय अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्था आणि डेल्फ्ट तंत्रज्ञान विद्यापीठ या दोन्ही संस्थांमधील विद्यार्थी तसेच विभागीय कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम व संशोधनात्मक कार्यक्रम राबवण्यासंदर्भात दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्य़क्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. या करारावर 09 एप्रिल 2021 आणि 17 मे 2021 ला संबधित विद्यापिठांकडून स्वाक्षऱ्या झाल्या व ते इमेलच्या माध्यमातून परस्परांना पाठवण्यात आले.
सामंजस्य कराराचा तपशील :
लाभ:
या करारान्वये कर्मचारी अदलाबदल, विद्यार्था शिक्षक व संशोधक अदलाबदल, विज्ञानसंबधीत साहित्य, प्रकाशने वा माहिती यांच्या देवाणघेवाणीतून महत्वपूर्ण सामायिक क्षेत्रातील संभाव्य सहकार्य
EWI, डेल्फ्ट तंत्रज्ञान विद्यापीठ या नेदरलँड्समधील सर्वात जुन्या व मोठ्या डच सार्वजनिक तंत्रज्ञान विद्यापीठाशी या करारातून साधलेल्या सहकार्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये संशोधनात्मक संयुक्त कार्यक्रम विकसित करण्याच्या दृष्टीने वाटचाल होईल.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com