नवी दिल्ली , 2 जानेवारी 2024
तामिळनाडूचे राज्यपाल थिरू आर एन रवी जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम के स्टॅलिन जी, भारतीदासन विद्यापीठाचे कुलगुरू थिरू एम सेल्वम जी, माझे तरुण मित्र, विद्यापीठातील प्राध्यापक आणि सहाय्यक कर्मचारी,
वनक्कम!
एनदु माणव कुडुम्बमे, भारतीदासन विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणे माझ्यासाठी खास आहे. 2024 मधील हा माझा पहिला सार्वजनिक संवाद आहे.तामिळनाडू या सुंदर राज्यात आणि तरुणांमध्ये आल्याबद्दल मला आनंद आहे. येथे दीक्षांत समारंभाला येण्याचा बहुमान मिळालेला मी पहिला पंतप्रधान आहे हे जाणूनही मला आनंद झाला. या महत्त्वाच्या प्रसंगी मी पदवीधर विद्यार्थी, त्यांचे पालक आणि प्राध्यापक यांचे अभिनंदन करतो.
एनदु माणव कुडुम्बमे,
अनेकदा, विद्यापीठाची निर्मिती ही कायदेशीर प्रक्रिया असते. कायदा केला जातो आणि विद्यापीठ अस्तित्वात येते. नंतर त्याअंतर्गत महाविद्यालये सुरू केली जातात. मग विद्यापीठाचा विस्तार होते आणि उत्कृष्टतेचे केंद्र बनते.मात्र भारतीदासन विद्यापीठाचा मुद्दा थोडा वेगळा आहे. 1982 मध्ये जेव्हा या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली तेव्हा अनेक विद्यमान आणि प्रतिष्ठित महाविद्यालये तुमच्या विद्यापीठांतर्गत आणण्यात आली. यापैकी काही महाविद्यालयांच्या गाठीशी महान व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा अनुभव आधीच होता. त्यामुळे भारतीदासन विद्यापीठाची सुरुवात बळकट आणि परिपक्व पायावर झाली. या परिपक्वतेमुळे तुमचे विद्यापीठ अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरले आहे. मानवता असो, भाषा असो, विज्ञान असो किंवा उपग्रह असो, तुमच्या विद्यापीठाने एक अनोखा ठसा उमटवला आहे !
एनदु माणव कुडुम्बमे,
आपले राष्ट्र आणि संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे. नालंदा आणि विक्रमशिला यांसारखी काही प्राचीन विद्यापीठे प्रसिद्ध आहेत. . त्याचप्रमाणे, कांचीपुरम हाऊसिंग ग्रेट युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणांचे संदर्भ आहेत.गंगई-कोण्ड-चोलपुरम् आणि मदुराई ही देखील ज्ञानार्जनाच्या उत्तम जागा होत्या. या ठिकाणी जगभरातून विद्यार्थी येत असत.
एनदु माणव कुडुम्बे,
त्याचप्रमाणे दीक्षांत समारंभाची संकल्पनाही आपल्यासाठी खूप प्राचीन आणि सर्वज्ञात आहे.उदाहरणार्थ, कवी आणि विचारवंतांची प्राचीन तमिळ संगम बैठक घ्या. या संगममध्ये, इतरांच्या विश्लेषणासाठी कविता आणि साहित्य सादर केले जात असे. . विश्लेषणानंतर, कवी आणि त्यांच्या कार्याला मोठ्या समुदायाकडून ओळख मिळत असे. आजही शिक्षण आणि उच्च शिक्षणात हेच तर्क वापरले जातात ! तर, माझ्या युवा मित्रांनो, तुम्ही ज्ञानाच्या महान ऐतिहासिक परंपरेचा भाग आहात.
एनदु माणव कुडुम्बमे,
कोणत्याही राष्ट्राला दिशा देण्यात विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा आपली विद्यापीठे सचेत होती, तेव्हा आपले राष्ट्र आणि संस्कृतीही सचेत होती.
जेव्हा आपल्या देशावर हल्ला झाला तेव्हा लगेच आपल्या ज्ञान व्यवस्थांनाच लक्ष्य केले गेले. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात महात्मा गांधी, पंडित मदन मोहन मालवीय आणि सर अन्नामलाई चेट्टियार यांसारख्या लोकांनी विद्यापीठे सुरू केली. स्वातंत्र्यलढ्यात ही विद्यापीठे ज्ञान आणि राष्ट्रवादाचे केंद्र होती.
त्याचप्रमाणे, आज भारताच्या उदयामागील एक घटक म्हणजे आपल्या विद्यापीठांचा उदय. भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आर्थिक वृद्धीत विक्रम करत आहे. त्याचवेळी, आपली विद्यापीठे देखील विक्रमी संख्येने जागतिक क्रमवारीत प्रवेश करत आहेत.
एनदु माणव कुडुम्बे,
तुमच्या विद्यापीठाने आज तुमच्यापैकी अनेकांना पदव्या बहाल केल्या आहेत.तुमचे शिक्षक, कुटुंब, मित्र, प्रत्येकजण तुमच्यासाठी आनंदी आहे.खरे तर, तुम्ही तुमचा पदवी पोशाख घालून बाहेर दिसलात, तर लोक तुम्हाला ओळखत नसले तरीही तुमचे अभिनंदन करतील.यामुळे तुम्हाला शिक्षणाचा उद्देश आणि समाज तुमच्याकडे आशेने कशाप्रकारे पाहतो याचा सखोल विचार करायला हवा.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे की, , सर्वोच्च शिक्षण आपल्याला केवळ माहिती देत नाही. मात्र हे आपल्याला सर्व परिस्थितीत सौहार्दाने जगण्यास मदत करते. या महत्त्वाच्या दिवसापर्यंत तुम्हाला पोहोचवण्यात गरिबातील गरीबांसह संपूर्ण समाजाची भूमिका होती. त्यामुळे त्यांना परत देणे, उत्तम समाज आणि देश निर्माण करणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश आहे. तुम्ही शिकलेले विज्ञान तुमच्या गावातील शेतकऱ्याला सहाय्य करू शकते. तुम्ही शिकलेले तंत्रज्ञान जटिल समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकते. तुम्ही शिकलेले व्यवसाय व्यवस्थापन व्यवसाय चालवण्यात मदत करू शकते आणि इतरांसाठी उत्पन्न वाढ सुनिश्चित करू शकते. तुम्ही शिकलेले अर्थशास्त्र गरिबी कमी करण्यात मदत करू शकते.संस्कृती बळकट करण्यासाठी कार्य करण्यास तुम्ही शिकलेल्या भाषा आणि इतिहास मदत करू शकतात.एक प्रकारे, येथील प्रत्येक पदवीधर 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यात योगदान देऊ शकतो!
एनदु माणव कुडुम्बमे,
2047 पर्यंतची वर्षे आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची वर्षे बनवण्यासाठी तरुणांच्या क्षमतेवर मला विश्वास आहे. महान कवी भारतीदासन यांनी म्हटले आहे की, पुदियदोर् उलगम् सेय्वोम्. हे तुमच्या विद्यापीठाचे ब्रीदवाक्यही आहे. याचा अर्थ आपण एक धाडसी नवीन जग निर्माण करूया. भारतीय तरुण आधीच अशा प्रकारचे विश्व निर्माण करत आहेत.तरुण शास्त्रज्ञांनी आपल्याला कोविड -19 दरम्यान लस जगामध्ये पाठवण्यात मदत केली. चांद्रयानसारख्या मोहिमेद्वारे भारतीय विज्ञान जगाच्या नकाशावर आले आहे. आपल्या नवोन्मेषकांनी 2014 मध्ये सुमारे 4,000 असलेली पेटंटची संख्या जवळपास 50,000 वर नेली आहे! आपले मानवतेचे विद्वान भारताची गाथा जगासमोर मांडत आहेत ,असे पूर्वी कधीही झाले नव्हते. . आपले संगीतकार आणि कलाकार सतत आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा , आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा आणि इतर स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी विक्रमी पदके जिंकली आहेत .जेव्हा प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकजण तुमच्याकडे नव्या आशेने पाहत आहे, अशा वेळी तुम्ही या जगात पाऊल ठेवत आहात.
एनदु माणव कुडुम्बमे,
तरुणाई म्हणजे ऊर्जा. याचा अर्थ वेग, कौशल्य आणि व्याप्तीसह कार्य करण्याची क्षमता. गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही तुमचा वेग आणि व्याप्तीशी सुसंगत काम केले आहे, जेणेकरून आम्हाला तुमचा फायदा होईल.
गेल्या 10 वर्षांत विमानतळांची संख्या 74 वरून दुप्पट होऊन जवळपास 150 झाली आहे! तामिळनाडूला चैतन्यदायी किनारपट्टी आहे. त्यामुळे, तुम्हाला हे जाणून आनंद होईल की,भारतातील प्रमुख बंदरांची एकूण मालवाहतूक क्षमता 2014 पासून दुप्पट झाली आहे. गेल्या 10 वर्षांत देशातील रस्ते आणि महामार्ग बांधणीचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे. देशातील नोंदणीकृत स्टार्ट अप्सची संख्या जवळपास 1 लाख झाली आहे. 2014 मध्ये हे प्रमाण शंभरपेक्षा कमी होते. भारताने महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांसोबत अनेक व्यापार करारही केले आहेत. हे करार आपल्या वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली करतील. .हे करार आपल्या तरुणांसाठी अपार नवीन संधी निर्माण करणारे आहेत. मग ते जी 20 सारख्या संस्थांना बळकट करणे असो, हवामान बदलाशी लढा असो किंवा जागतिक पुरवठा साखळीत मोठी भूमिका बजावत असो, प्रत्येक जागतिक उपायाचा एक भाग म्हणून भारताचे स्वागत केले जात आहे.अनेक प्रकारे, स्थानिक आणि जागतिक घटकांमुळे, भारतीय तरुणांसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि आपल्या देशाला नवीन उंचीवर घेऊन जा.
एनदु माणव कुडुम्बमे,
तुमच्यापैकी काही जण विचार करत असतील की आज तुमच्यासाठी विद्यापीठीय जीवनाचा शेवट आहे. हे खरे असू शकते, मात्र शिकणे संपत नाही. तुम्हाला तुमच्या प्राध्यापकांकडून यापुढे जरी शिकवले जाणार नसले तरी आयुष्य तुमचे शिक्षक बनेल. सतत शिकण्याच्या भावनेने, अनध्ययनावावर मात करण्यासह रिस्किलिंग म्हणजेच कौशल्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि अप स्किलिंग म्हणजेच कौशल्य वाढवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे. कारण, झपाट्याने बदलणाऱ्या जगात, एकतर तुम्ही बदल घडवून आणता किंवा बदल तुम्हाला घडवतो. पुन्हा एकदा, मी आज येथे पदवीधर झालेल्या तरुणांचे अभिनंदन करतो.
मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो!
मिक्क ननरी
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Delighted to address the Convocation ceremony at Bharathidasan University in Tiruchirappalli. https://t.co/ssUOpv9Mrm
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2024
Bharathidasan University started on a strong and mature foundation: PM @narendramodi pic.twitter.com/WavwOjIVuS
— PMO India (@PMOIndia) January 2, 2024
Universities play a crucial role in giving direction to any nation: PM @narendramodi pic.twitter.com/Evqkohj4zL
— PMO India (@PMOIndia) January 2, 2024
I am confident in the ability of young people to make the years till 2047 the most important in our history: PM @narendramodi pic.twitter.com/0KAHZPlis8
— PMO India (@PMOIndia) January 2, 2024
Youth means energy. It means the ability to work with speed, skill and scale: PM @narendramodi pic.twitter.com/he1A83dFsM
— PMO India (@PMOIndia) January 2, 2024
India is being welcomed as a part of every global solution: PM @narendramodi pic.twitter.com/qWsyq4uPMX
— PMO India (@PMOIndia) January 2, 2024
Our civilisation has always celebrated knowledge, learning and innovation. pic.twitter.com/ZB2Gzm5tBe
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2024
The world is looking at India’s Yuva Shakti with great hope. pic.twitter.com/P0C9mMgvvP
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2024