Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताने नुतनीकरण केलेल्या जाफना येथील दुरईअप्पा स्टेडिअमचे श्रीलंकेच्या जनतेला लोकार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना उद्या सकाळी जाफना येथील नुतनीकरण करण्यात आलेला दुरईअप्पा स्टेडियम संयुक्तपणे श्रीलंकेच्या जनतेला समर्पित करणार आहेत. राष्ट्रपती सिरिसेना जाफना स्टेडियममध्ये उपस्थित राहतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होतील.

जाफनाचे महापौर दिवंगत अल्फ्रेड थंबीराजा दुरईअप्पा यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या स्टेडियमचे भारत सरकारने 7 कोटींहून अधिक रुपये खर्चून नुतनीकरण केले.

नुतनीकरण करण्यात आलेल्या स्टेडियमची आसन क्षमता 1850 इतकी आहे. श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रांतातील युवकांच्या सर्वांगीण विकासाला मदत करण्यासाठी तसेच क्रीडा आणि मनोरंजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा यामुळे उपलब्ध होतील.

1997 पासून या स्टेडियमचा वापर बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती सिरिसेना यांच्यासमोर नुतनीकरण करण्यात आलेल्या स्टेडियममध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. आठ हजारांहून अधिक लोक या योगासन कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

S.Kane/B.Gokhale