भारतात अखंड, स्थिर आणि कार्बन निर्मिती कमी राखणाऱ्या औष्णिक वीज विकासासाठी भारत आणि जपान यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली. या सामंजस्य करारामुळे भारताला अखंड, स्थिर आणि कमी कार्बन निर्मिती करणाऱ्या विद्युत विकासाला प्रोत्साहन देण्याबाबतचे अडथळे दूर करण्यासाठी मदत होणार आहे.
पूर्व प्राथमिक अभ्यास, उर्जा सक्षमता, आधुनिकीकरणाच्या दिशेने सहकार्य, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान याद्वारे हे विषय आणि अडथळे जाणून घेतले आहेत. भारतातल्या सर्वांगिण विद्युत विकासासाठी या बाबी अनुकूल असून, संबंधित धोरणाची अंमलबजावणी यामुळे सुकर होणार आहे.
N. Chitale / B. Gokhale