Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले.

नेपाळच्या पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

तुमच्या हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद पंतप्रधान @kpsharmaoli. भारत आपल्या प्रजासत्ताकाची 75 वर्षे पूर्ण करत असताना, आम्ही आपल्या दोन्ही देशांच्या लोकांमधील मैत्रीच्या ऐतिहासिक बंधांना देखील मनापासून जपत आहोत. येणाऱ्या काळात हे बंध आणखी दृढ होत जातील याचा मला विश्वास आहे.”

मालदीवच्या राष्ट्रपतींनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

भारताच्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपती @MMuizzu यांचे आभार. भारत आणि मालदीवमधील दीर्घकालीन भागीदारीबद्दल तुमच्या आणि माझ्या भावना पूर्णपणे एकरुप  आहेत. मैत्री आणि सहकार्याचे हे बंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

भूतानच्या पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी माझे मित्र, पंतप्रधान @tsheringtobgay यांचे आभार. भारत आणि भूतानमधील अनोखी आणि विशेष भागीदारी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.”

नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त @SherBDeuba यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आपल्या देशातील नागरिकांमधील मैत्रीचे जुने संबंध असेच वाढत राहोत आणि अधिक दृढ होत राहोत.”

मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल @ibusolih यांचे आभार.”

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com