Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या प्राचीन धार्मिक परंपरेचा निदर्शक महा कुंभ म्हणजे धार्मिक आस्था आणि समरसतेचा उत्सव : प्रधानमंत्री


महाकुंभ म्हणजे  भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आणि श्रद्धा व सौहार्द यांचा उत्सव: पंतप्रधान

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे सुरू होणाऱ्या महाकुंभ २०२५ च्या शुभारंभानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती जोपासणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. महाकुंभ हा  भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असून श्रद्धा व सौहार्द  यांचा उत्सव आहे’ असे मोदी यांनी म्हटले आहे   .

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे, 

“भारतीय मूल्ये आणि संस्कृती जोपासणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी आजचा एक अतिशय खास दिवस !

प्रयागराज येथे महाकुंभ २०२५ चा प्रारंभ होत असून, श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमासाठी असंख्य लोक एकत्र येत आहेत. महाकुंभ भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असून श्रद्धा व सौहार्द यांचा उत्सव साजरा करत आहे .”

“प्रयागराज इथे कोट्यवधी भारतीय पवित्र स्नान करण्यासाठी व देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जमलेले पाहून मला अतिशय आनंद होत आहे. सर्व यात्रेकरू व पर्यटकांचा येथील निवास सुखद होण्यासाठी माझ्या शुभेच्छा!”

***

JPS/UmaR/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai