पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि सिंगापूरचे व्यापार आणि उद्योग मंत्रालय यांच्यातल्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य संबंधी सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. या सामंजस्य करारावर फेब्रुवारी 2022 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती.
या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमध्ये नवोन्मेश तसेच उद्योजकतेला चालना देणारी यंत्रणा आणि परिसंस्था निर्माण करण्यात मदत होईल आणि सहकार्यातून नवीन तंत्रज्ञान निर्मिती, मनुष्यबळ प्रशिक्षण, आयपी निर्मितीला चालना मिळेल.
या सहकार्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांद्वारे नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास आत्मनिर्भर भारताला चालना देईल. सामंजस्य करार एक यंत्रणा प्रदान करेल आणि एक परिसंस्था तयार करण्यात मदत करेल , ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना मिळेल आणि सहकार्याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती, मनुष्यबळ प्रशिक्षण, आयपी निर्मिती होईल. सामंजस्य करारामध्ये नमूद उपक्रमांमध्ये उत्पादन विकास आणि तंत्रज्ञान आदानप्रदान समाविष्ट असेल, ज्यामुळे नवीन उद्योग आणि रोजगार निर्मिती होऊ शकेल.
भारत आणि सिंगापूर दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या समान हिताच्या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देऊन ते विकसित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये प्रगती करू शकणार्या परस्पर हिताच्या कोणत्याही क्षेत्रात सहकार्याला प्राधान्य दिले जाईल:
1. कृषी आणि अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान;
2. प्रगत उत्पादन आणि अभियांत्रिकी;
3. हरित अर्थव्यवस्था, ऊर्जा, पाणी, हवामान आणि नैसर्गिक संसाधने;
4. डेटा सायन्स, उदयोन्मुख तंत्रज्ञान
5. प्रगत सामुग्री ; आणि
6. आरोग्य आणि जैव तंत्रज्ञान.
सामायिक हिताची इतर क्षेत्रे परस्पर संमतीने समाविष्ट केली जातील.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com