Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांच्या हस्ते स्मृती नाणे जारी

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मृती नाण्याचे प्रकाशन केले. या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, अटलजी यापुढे आपल्यात नसणार यावर विश्वास ठेवण्यास मन तयार नाही. समाजातील सर्व वर्गांमध्ये ते प्रेमळ आणि आदरणीय होते.

त्यांनी सांगितले की, अनेक दशके, वाजपेयींचा आवाज हा लोकांच्या आवाजा सारखाच राहिला आहे. ते अद्वितीय वक्ता होते. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आमच्या राष्ट्राने निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट वक्तांपैकी ते एक होत.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, वाजपेयी यांनी स्वतःच्या कारकिर्दीचा बराच काळ विरोधी पक्षांत व्यतीत केला असला तरीही त्यांनी सदैव राष्ट्रीय हिताचा विचार केला. वाजपेयी यांची लोकशाही सर्वोच्च रहावी अशी सदैव इच्छा होती. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, वाजपेयी आपल्या सर्वांसाठी सैदव एक प्रेरणा म्हणून कायम राहतील.

B.Gokhale/P.Malandkar