Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भागीरथ अभियानाचे पंतप्रधानांकडून उद्‌घाटन; तेलंगणामधील मुख्य विकास प्रकल्पांची पंतप्रधानांतर्फे पायाभरणी

भागीरथ अभियानाचे पंतप्रधानांकडून  उद्‌घाटन; तेलंगणामधील मुख्य विकास प्रकल्पांची पंतप्रधानांतर्फे पायाभरणी

भागीरथ अभियानाचे पंतप्रधानांकडून  उद्‌घाटन; तेलंगणामधील मुख्य विकास प्रकल्पांची पंतप्रधानांतर्फे पायाभरणी

भागीरथ अभियानाचे पंतप्रधानांकडून  उद्‌घाटन; तेलंगणामधील मुख्य विकास प्रकल्पांची पंतप्रधानांतर्फे पायाभरणी


पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील मेडक जिल्हयातील गाजवेल येथील कोमातीबंदा गावामध्ये भागीरथ अभियानाचे उद्‌घाटन केले. सर्वांना सुरक्षित पेयजल पुरविण्याच्या उद्देशाने राज्य सरकाने ही योजना सुरु केली आहे.

पंतप्रधानांनी यावेळी महत्वपूर्ण विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये रामागुंडम येथे राष्ट्रीय अणू ऊर्जा महामंडळाचे 1600 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा केंद्र, रामागुंडम्‌ नारायण राव विद्यापीठ, वारंगल, मनाहराबाद-कोतापल्ली रेल्वे मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी अदिलाबाद जिल्हयातील जयपूर येथील सिंगारेनी कोळसा खाण येथील 1200 मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा केंद्र राष्ट्राला समर्पित केले.

विशाल जनसमुदायाला संबोधित करतांना पंतप्रधानांनी, गेल्या दोन वर्षात लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. देशाच्या विकासासाठी सकारात्मक संघराज्यवादाचे महत्व अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, या उद्देश्यपूर्ती करीता केंद्र आणि राज्य सरकार आता एकत्रित काम करीत आहेत.

राज्यातील नागरिकांच्या पेयजल पूर्तीसाठी भागीरथ अभियान सुरु केल्याबद्दल राज्य सरकारचे कौतुक करतांना पंतप्रधान महणाले की, जेव्हा कधी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माझी भेट घेतली तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी राज्यांचा विकास आणि पाण्यासंबंधी मुद्दयांवर चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी यावेळी पाण्याचे महत्व सांगितले तसेच सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी करताना पंतप्रधान म्हणाले की, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली लोकांची मागणी आता पूर्ण होत आहे. खत कारखान्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सहाय्य मिळेल. त्यांनी यावेळी ऊर्जा क्षेत्रातील बदल, जलसंधारण आणि आर्थिक विकास हा कशाप्रकारे रेल्वेशी जोडलेला आहे हे सांगितले.

तथाकथित गोरक्षकांपासून लोकांनी सावध रहावे आणि राज्य सरकारांनी अशा लोकांविरुध्द कारवाई करावी असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

BG/SM/AK