Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनचे उद्‌घाटन केले. यामुळे नर्मदा नदीचे पाणी तप्पार धरणात सोडणं शक्य होणार आहे.

आजचे उद्‌घाटन कच्छसाठी अभिमानास्पद आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी विशाल जनसभेला संबोधित करताना सांगितले. पाण्याच्या बचतीचे महत्व सांगताना, कच्छमधली जनता पाण्याचे मोल जाणते, असे पंतप्रधान म्हणाले. गुजरातमधल्या सरकारांनी जलसंवर्धनावर भर दिला आहे. नर्मदा नदीचे पाणी मिळाल्याने या विभागाचा कायापालट होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

गुजरातमधल्या इतर शहरांप्रमाणेच भूजलाही आधुनिक बस स्थानक मिळेल. विकासात्मक आणि सकारात्मक कार्यावर भर देण्यात येत असून, यामुळेच राज्य नवे शिखर गाठेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane