Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भगवान महावीर यांच्या 2550व्या निर्वाण महोत्सवाचे, पंतप्रधानांच्या हस्ते 21 एप्रिल रोजी उद्घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे महावीर जयंतीच्या शुभ प्रसंगी भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता करणार आहेत. यावेळी पंतप्रधान एका स्मृती तिकीटाचे आणि नाण्याचे प्रकाशन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

24 वे तीर्थंकर असलेल्या भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या जैन सिद्धांतांच्या माध्यमातून शांततामय सहअस्तित्व आणि सार्वत्रिक बंधुभाव यांचा मार्ग प्रकाशित केला.

जैन बांधव महावीर स्वामीजींसह प्रत्येक तीर्थकरांचे पाच कल्याणक (प्रमुख कार्यक्रम) साजरे करतात. ते आहेत च्यवन/गर्भ (धारणा) कल्याणक, जन्म कल्याणक, दीक्षा कल्याणक, केवलज्ञान कल्याणक आणि निर्वाण कल्याणक.

21 एप्रिल 2024 हा दिवस भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक आहे आणि या निमित्ताने भारत मंडपम येथे उपस्थित राहणाऱ्या आणि या समारंभाला आशीर्वाद देणाऱ्या जैन समुदायातील संतांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सरकार हा सोहळा साजरा करत आहे.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai