Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची घेतली भेट


11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान ब्राझिलिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची 13 नोव्हेंबरला भेट घेतली.

चेन्नई येथे दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेचे यजमानपद भुषवल्याबद्दल जिनपिंग यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेनं केलेले स्वागत आपल्या स्मरणात असल्याचे ते म्हणाले. तिसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी 2020 मध्ये चीनला येण्याचे निमंत्रण त्यांनी पंतप्रधानांना दिले. राजनैतिक माध्यमातून परिषदेची तारीख आणि ठिकाण ठरवण्यात येईल.

व्यापार आणि गुंतवणुकीबाबत चर्चा संवाद सुरू ठेवण्याचे महत्व दोन्ही नेत्यांनी मान्य केले. शांघाय येथे नुकत्याच झालेल्या चीन आयात-निर्यात प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल जिनपिंग यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. व्यापार आणि अर्थव्यवस्था यावरच्या उच्चस्तरीय यंत्रणेने लवकरच भेट घ्यावी याबाबतही उभय नेत्यांचे एकमत झाले.

दोन्ही देशातल्या राजनैतिक संबंधांना पुढच्या वर्षी 70 वर्ष होत असल्याबदृदल होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा या नेत्यांनी घेतला. यामुळे उभय देशातल्या जनतेचे संबंध प्रगाढ होतील असे या नेत्यांनी म्हटले आहे. सीमा विषयक प्रश्नांबाबत विशेष प्रतिनिधी आणखी एक बैठक घेतील. सीमावर्ती भागात शांतता आणि सुरक्षितता राखण्याचा महत्वाचा दोन्ही नेत्यांनी पुनरूच्चार केला. जागतिक व्यापार परिषद, ब्रिक्स आक्षेप यासारख्या बहुपक्षीय मुद्यांबाबत उभय नेत्यांनी विचारांचे अदान-प्रदान केले.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor