Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बोधगया येथील महाबोधी मंदिरातील पंतप्रधानांचे भाषण

बोधगया येथील महाबोधी मंदिरातील पंतप्रधानांचे भाषण

बोधगया येथील महाबोधी मंदिरातील पंतप्रधानांचे भाषण

बोधगया येथील महाबोधी मंदिरातील पंतप्रधानांचे भाषण

बोधगया येथील महाबोधी मंदिरातील पंतप्रधानांचे भाषण

बोधगया येथील महाबोधी मंदिरातील पंतप्रधानांचे भाषण


बिहारचे राज्यपाल श्री राम नाथ कोविंद

आदरणीय खांबा लामा, च. डेंबेरेल, मंगोलिया

आदरणीय मिंग कुआंग शी, तैवान

आदरणीय थिक थिन तम, व्हिएतनाम

आदरणीय तेलो तुलकू रिंपोशे, रशिया

आदरणीय बनागला उपातिसा, श्रीलंका

आदरणीय लामा लोबझँग

माझे मंत्रिमंडळातील सहकारी श्री किरेण रिजीजू

भूतानचे मंत्री लिम्पो नमगे दोरजी

मंगोलियाचे मंत्री बायरसैखान

महासंघाचे आदरणीय सभासद, परदेशाहून आलेले मंत्री व अधिकारीवर्ग

मी तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. बोधगया येथे आल्याबद्दल मला धन्य वाटत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर या पवित्र स्थळाला भेट देण्याची संधी मला मिळाली.

एका खास दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना भेटत आहे. आज, आपण देशभर आपले दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षकदिन साजरा करत आहोत.

या परिसंवादात आपण जागतिक इतिहासातील प्रभावी शिक्षकांपैकी एक असलेल्या गौतम बुद्धांबद्दल बोलत आहोत. बुद्धांच्या शिकवणीने शतकानुशतके अनेकांना प्रेरणा दिली आहे.

आज आपण भगवान श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टीही साजरी करत आहोत. श्रीकृष्णाकडून जगाला शिकण्यासारखे खूप काही आहे. जेंव्हा आपण श्रीकृष्णाबद्दल बोलतो तेंव्हा आपण, श्री कृष्णम वंदे जगतगुरूम, म्हणजे श्रीकृष्ण सर्व शिक्षकांचा शिक्षक, सर्व गुरूंचा गुरू आहे, असे म्हणतो.

गौतम बुद्ध व श्रीकृष्ण दोघांनीही जगाला फार मोठी शिकवण दिली आहे. आजच्या परिषदेची संकल्पना या दोघांनी सांगितलेल्या मुल्य व आदर्शांनी प्रेरित आहे.

महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णाने आपला संदेश दिला तर गौतम बुद्धाने नेहमी युद्धाच्या पलिकडे विचार करण्यावर भर दिला. दोघांचांही संदेश धर्म प्रस्थापित करण्यासाठीच होता. दोघांनीही तत्व आणि प्रक्रियांना अग्रस्थान दिले. गौतम बुद्धांनी अष्टांगमार्ग व पंचशील यांची शिकवण दिली. तर, श्रीकृष्णाने आयुष्यात कर्मयोगासंबंधी अमूल्य मार्गदर्शन केले. या दोन्ही महान आत्म्यांमध्ये लोकांना परस्परविरोध सोडून एकत्र आणण्याची शक्ती होती. यांची शिकवण अतिशय व्यावहारिक, शाश्वत आणि पूर्वीपेक्षाही आजच्या काळात लागू होणारी आहे.

आपण ज्याठिकाणी जमलो आहोत ही सुद्धा एक विशेष बाब आहे. आपण बोधगया येथे भेटत आहोत, या जागेला मानवी जीवनाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे.
ही ज्ञानप्रसाराची भूमी आहे. काही वर्षांपूर्वी, बोधगयाला सिद्धार्थ मिळाला होता, पण बोधगयाने जगाला गौतम बुद्ध दिला. थोडक्यात ज्ञान, शांती व करुणा दिली.

म्हणून, बैठक व चर्चा करण्यासाठी हे ठिकाण आदर्शवत आहे. जन्माष्टमीसारखा पवित्र दिवस व शिक्षकदिनासारखा खास दिवस यामुळे तर ही बैठक अद्वितीय ठरली आहे.

दोन दिवसांपूर्वीच दिल्ली येथे “कलह निरसन व पर्यावरणीय जाणीव” या विवेकानंद आंतराष्ट्रीय संस्था व टोकिओ फाऊंडेशनने आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट महासंघाच्या सहकार्याने आयोजित परिषदेच्या उद्घाटनसमारंभात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हे माझे अहोभाग्य.

कलह निरसन ते कलह रोखणे आणि पर्यावरणीय नियामक ते पर्यावरणीय जाणीव ही या परिषदेची परिसंकल्पना होती.

मानवतेला कधी नव्हे ते सध्या जाणवणाऱ्या दोन प्रमुख धोक्यांबद्दल मी या परिषदेत माझे विचार व्यक्त केले. मला आठवते की, दोन्ही मुद्यांसंदर्भात जागतिक परिपेक्ष कसे बदलत आहे, कलह निरसन आणि पर्यावरणीय नियमन दोन्हीसाठी जग आज बदललेल्या नजरेने बुद्धाकडे पाहत आहे. दोन्ही मुद्दे राज्याच्या नैमत्तिक क्षमतेवर आधारित आहेत, व सततच्या आव्हानांसमोर निष्प्रभ होत आहेत.

अध्यात्मिक व धर्मगुरु, बुद्धीवंतांनी दोन दिवसीय परिषदेत सहभाग नोंदवून या दोन मुद्यांवर उहापोह केला. दोन दिवसीय परिषदेतील यश पाहून अध्यात्मिक, धर्मगुरू व बुद्धीवंतांनी भाग घेतलेल्या अशाप्रकारची परिषद जानेवारी 2016 मध्ये घेणार असल्याचे टोकिओ फाऊंडेशनने जाहीर केले. इतर बौद्ध राष्ट्रांनीही आपापल्या देशांमध्ये अशाप्रकारच्या परिषदा घेण्याचा प्रस्ताव ठेवला.

ही अतिशय असामान्य अशी घटना आहे, जी आशियाच्या आर्थिक व नागरी उदयाशी संबंधित आहे. परिषदेची संकल्पना, जी हिंदु बुद्धीस्ट नागरी, सांस्कृतिक दृष्टीने आकारली होती, ती कलह निरसन व पर्यावरणीय जाणीवा या दोन्ही मुद्यांवर आशिया व बाहेर मतैक्य घडवून आणणारी होती.

दोन दिवसीय परिषदेत दोन्ही मुद्यांवर व्यापक मतैक्य झाल्याचे दिसते. प्रामुख्याने धार्मिक असहिष्णुतेमुळे निर्माण होणाऱ्या वादांवर परिषदेतील सहभागितांनी प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे मान्य केले, जेंव्हा काही मूलगामी विचारसरणी आपले विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे वाद निर्माण होतात. पर्यावरणाच्या मुद्यावर परिषदेत धर्माच्या तात्विक आधारावर मतैक्य झाले, ज्यात शाश्वत विकासासाठी नैसर्गिक वारशाचे जतन करण्यावर भर दिला आहे. स्थानिक लोकांची संस्कृती व विकास परस्पर पूरक असतील तरच शाश्वत विकास शक्य असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचेही मत असल्याचे मी याठिकाणी नमूद करतो.

माझ्या मते, हे जगाच्या विविधतेत विकासासाठीचे सकारात्मक प्रारूप आहे. मी या ठिकाणी नमूद करतो की, जागतिक पातळीवरील बदलत्या विचारसरणीने हिंदु-बौद्ध समुदायाला त्यांचे विचार जागतिक स्तरावर मांडण्याची संधी मिळाली आहे. मला वैयक्तिरित्या कलह निवारण व पर्यावरण जाणीवा यावरील हिंदु-बौद्ध परिषद ही या दोन मुद्यांवरील अतिशय महत्वाची घटना वाटते.

गौतम बुद्धाच्या शिकवणूकीचा हिंदु तत्वज्ञानाला मोठा फायदा झाला आहे.
हिंदुत्वावर बुद्धाचा असलेला प्रभाव या विषयावर अनेक विद्वानांनी विश्लेषण केली आहे. खरं तर, आदी शंकराचार्यांवर बुद्धांचा प्रभाव असल्याची टीका केली जात होती. त्यांना “प्रछन्न बुद्ध” असेही म्हटले जात होते. याचा अर्थ शंकर हे अदृश्य अवतारातील बुद्ध आहेत असा होतो. हा आदी शंकरांवर असलेला बुद्धांचा प्रभाव होय, बहुतेकांनी त्यांना सर्वश्रेष्ठ हिंदु तत्ववेत्ता मानले आहे. जनतेच्या पातळीवर बुद्धांची लोकप्रियता पाहून गीत गोविंदमध्ये जयदेव यांनी अहिंसेची शिकवण देणारी देवता म्हणजे महाविष्णू असे संबोधले आहे. म्हणून, बुद्धाच्या आगमनानंतर हिंदु धर्म हा बौद्ध हिंदुधर्म किंवा हिंदु बौद्धधर्म असा ओळखला जातो. हे दोन्ही आज अविभक्त असे मिश्रण आहे.

स्वामी विवेकानंदांनी गौतम बुद्धांची केलेली प्रशंसा, त्यांच्याच शब्दात

बुद्धांचा जन्म झाला त्यावेळी भारताला एका श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू, प्रेषिताची गरज होती. बुद्ध वेद, जात, धर्मगुरु, रितीरिवाज, यांच्यापुढे कधीही नतमस्तक झाले नाहीत. त्यांनी निर्भयपणे विचारपूर्वक विचार केला. सत्याचा शोध आणि जिवीत असलेल्या प्रत्येकाविषयी जिव्हाळा जगाने यापूर्वी कधी पाहिला नव्हता.

बुद्ध कोणत्याही शिक्षकापेक्षा शूर व प्रामाणिक होते.

जगातला नितिमत्तेची शिकवण देणारा पहिला मानव म्हणजे गौतम बुद्ध. चांगल्यासाठी चांगले, प्रेमासाठी प्रेम ही त्यांची शिकवण होती.

समतेचा संदेश देणारे बुद्ध श्रेष्ठ मार्गदर्शक होते. प्रत्येक स्त्री-पुरुषाला अध्यात्माचा पुरस्कार करण्याचा समान अधिकार असल्याची त्यांची शिकवण होती.

मी वैयक्तिरित्या भारताला बुद्धिस्ट भारत म्हणतो कारण धार्मिक विद्वानांनी आपल्या साहित्यातून बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार केला.

एका श्रेष्ठ हिंदु तत्ववेत्त्याने दिलेली ही महान आदरांजली. त्यामुळे सध्याच्या हिंदुत्वाला बुद्धिस्ट हिंदुत्व म्हणणे चुकीचे ठरते का?

बुद्ध म्हणजे भारत देशाच्या मुकुटातील हिरा होय, जो प्रत्येक धर्माला आपापल्या पद्धतीनुसार आचरणाची परवानगी देतो. भारतातील हिंदुत्वाचे हे वैशिष्ट्ये म्हणजे अनेक अध्यात्मिक गुरुंची देण होय, त्यापैकी प्रमुख म्हणजे बुद्ध. आणि हेच भारत धर्मनिरपेक्ष असल्याचे दर्शवते.

बोधगयामध्ये बुद्धांनी केलेला ज्ञान प्रसार हा हिंदुत्वाच्या ज्ञान प्रसारावरही प्रकाश टाकतो.

या प्राचीन देशाचा प्रथम सेवक या नात्याने मी बुद्धाचा आदर करतो, ते केवळ हिंदु धर्माचे नाही तर पूर्ण जगाचे सुधारक होते. त्यांनी जगाला एक नवी दृष्टी दिली, जी आज आपल्याला व जगाला तग धरून राहण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

बोधगया हे तीर्थक्षेत्र असल्याचे जगभरातील बुद्धीस्ट मानतात. आम्ही बोधगयाचा अध्यात्मिक राजधानी होईल यादृष्टीने विकास करणार आहोत, जी भारत व जगातील बौद्ध धर्मिय देश यांच्यातील दुवा ठरेल. या स्थळासाठीच्या सर्व अध्यात्मिक गरजा भारत सरकार पुरवेल.

बौद्ध धर्मियांचे व अध्यात्मिक गुरूंचे घोषणापत्र वाचून मला आनंद झाला. हे घोषणापत्र मेहनत व व्यापक संवादाच्या माध्यमाचे फलित होय. त्यामुळेच हे घोषणापत्र पुढील मार्गासाठीचा दिशादर्शक दस्तावेज आहे. मी जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्या विचाराशी सहमत आहे, त्यांनी काही दिवसांपूर्वीच सहिष्णुतेची महती, वैविध्याचा पुरस्कार, दया, बंधुता यावर भर दिला होता. आजच्या या समारंभासाठी त्यांचा संदेश आणि सततचा पाठिंबा ही आम्हाला बळ देणारी बाब होय.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा. या परिषदेने जागतिक शांतता व समाजातील एकोप्यासाठी वाद टाळून संवादावर भर देण्याचा विश्वास निर्माण केला आहे. पुढील पिढ्यांपर्यंत आपली विद्वता पोहचवण्याच्या तुमच्या सततच्या व ठाम प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा. त्यांच्यासाठी व आपल्यासाठी हे महत्वाचे नाही तर अखिल मानव जातीच्या प्रगतीसाठी आणि वसुंधरेकडून मिळालेल्या सुंदर देणगीसाठी हे आवश्यक आहे.

धन्यवाद.

S.Thakur/M.Desai