नवी दिल्ली, 25 मे 2021
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या म्हणजेच 26 मे 2021 रोजी सकाळी 09:45 वाजता होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण होणार आहे.
संस्कृती मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात, जगभरातील सर्व बुद्धिस्ट संघांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. तसेच जगभरातील प्रमुख बौद्ध धर्मपीठांमधील 50 पेक्षा जास्त धर्मिक मार्गदर्शक या परिषदेत आपले विचार मांडतील.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com