मी म्हणेन महात्मा गांधी,
तुम्ही सगळे म्हणा , अमर रहे, अमर रहे
महात्मा गांधी, अमर रहे, अमर रहे
महात्मा गांधी, अमर रहे, अमर रहे
महात्मा गांधी, अमर रहे, अमर रहे
चंपारण्यच्या पवित्र धरतीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्वच्छग्रही बंधू-भगिनी, सर्व स्नेही, सर्व मान्यवरांना मी प्रणाम करतो. सर्वाना माहित आहे की, चंपारण्याच्या याच पवित्र भूमीवरून बापूंनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळावी यासाठी अहिंसक शस्त्रात्रे सत्याग्रहाच्या रूपात आपल्याला मिळाले. सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली. ‘सत्याग्रह ते स्वच्छाग्रह’ आजच्या काळाची गरज होती.
चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी चंपारण्यच्या बडहवा लखनसेन येथून महात्मा गांधी यांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
आज आपण सत्याग्रह ते स्वच्छाग्रहाच्या माध्यमातून बापूंचे स्वच्छता अभियान पुढे नेऊया.
मंचावर उपस्थित बिहारचे राज्यपाल श्रीमान सतपाल मलिकजी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी रविशंकर प्रसादजी, रामविलास पासवानजी , उमा भारतीजी,राधामोहन सिंगजी, गिरीराज सिंहजी , श्रीराम कृपाल यादवजी, एस.एस. अहलुवालियाजी , अश्विनी कुमार चौबेजी, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीजी, राज्य मंत्रिमंडळातील श्रवणकुमारजी, विनोदनारायण झा जी, प्रमोद कुमारजी, आणि इथे उपस्थित हजारो सत्याग्रही आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडलेले सर्व सहकारी, स्त्री आणि पुरुष गण जे लोक म्हणतात की इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत नाही, ते इथे येऊन पाहू शकतात की कशा प्रकारे शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास आपल्यासमोर आज पुन्हा साक्षात उभा आहे. एक प्रकारे माझ्या समोर असे स्वच्छाग्राही बसले आहेत ज्यांच्या अंतर्मनात गांधींच्या विचारांचा, गांधींच्या आचरणाचा , गांधींच्या आदर्शांचा अंश जिवंत आहे.
मी अशा सर्व स्वच्छग्रहींच्या आत विराजमान महात्मा गांधींच्या अंशाला शतशः वंदन करतो. चंपारण्यच्या या पवित्र भूमीवर लोकचळवळीचे असेच चित्र शंभर वर्षांपूर्वी जगाने पाहिले होते आणि आज पुन्हा एकदा हे दृश्य पाहून संपूर्ण जग बापूंचे पुन्हा एकदा पुण्यस्मरण करत आहे.
शंभर वर्षांपूर्वी चंपारण्यमध्ये देशभरातून लोक आले होते. गांधीजींच्या नेतृत्वाखाली गल्ल्या-गल्ल्यांमध्ये फिरून काम केले होते. शंभर वर्षांनंतर आज त्याच भावनेने देशाच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी इथल्या उत्साही तरुण स्वच्छाग्रहींच्याबरोबर खांद्याला खांदा भिडवून दिवसरात्र काम केले आहे. आज या विशाल समूहात कुणी कस्तुरबा आहे, कुणी राजकुमार शुक्ल आहे, कुणी प्रसाद आहे, कुणी शेख गुलाब आहे, लोमराज सिंह आहे, हरिवंशराय आहे, शीतलराय आहे, बिन मुहम्मद मुनीस आहे. कुणी डॉक्टर राजेंद्र बाबू आहे, कुणी धरतीधर बाबू आहे, कुणी रामनवमी बाबू आहे, जे.पी. कृपलानीजी आहेत.
शंभर वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे सत्याग्रहाने अशा महान व्यक्तींच्या आयुष्याला नवी दिशा दिली, त्याचप्रमाणे आजचा हा स्वच्छाग्रह तुमच्यासारख्या देशातील लाखो करोडो लोकांच्या आयुष्याला नवी दिशा देत आहे. ‘चलो चंपारण्य’ या नाऱ्यासह हजारो स्वच्छाग्रही देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन आज इथे जमले आहेत. तुमचा उत्साह, उमंग, ऊर्जा, राष्ट्रनिर्माणाप्रती आतुरता, बिहारच्या जनतेची इच्छा यांना मी वंदनकरतो, प्रणाम करतो. मंचावर येण्यापूर्वी मी स्वच्छतेबाबत एक प्रदर्शन देखील पाहिले. या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान, नवीन उद्योगांबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. चंपारण्य सत्याग्रहाला शंभर वर्षपूर्ण झाल्यानिमित्त जे कार्यक्रम सुरु होते, त्यांच्या सांगतेची देखील ही वेळ आहे. मात्र सांगतेपेक्षा अधिक ही सुरुवात आहे स्वच्छतेप्रति आपला आग्रह अधिक वाढवण्याची.
बंधू आणि भगिनींनो,
पूर्वेकडील राज्यांना भारताच्या विकासाचे सुकाणू मानण्यात आले आहे, आजचे हे प्रकल्प केंद्र सरकारच्या त्या दृष्टिकोनाचे व्यापक रुप आहे. पूर्व उत्तर प्रदेश,बिहार,पश्चिम बंगाल,ओदिशा पासून ईशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम आमचे सरकार करत आहे. या आधी ह्या राज्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामे कधीच झाली नव्हती.
बिहारसह पूर्व भारताच्या गरजा लक्षात घेऊन योजना तयार केल्या जात आहेत,नितीश जी या सर्वाचे साक्षीदार आहेत. नवीन प्रकल्प सुरु केले जात आहेत. विशेषतः ह्या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याकडे आमच्या सरकारचे विषयच लक्ष आहे.
21 व्या शतकातील गरजा लक्षात घेत या प्रदेशातील महामार्ग, रेल्वे, जलमार्ग, आय वे आदी सुविधांचा जलद गतीने विकास केला जात आहे. आज अंदाजे 900 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. औरंगाबाद ते चौरदाह पर्यंतचा चार पदरी मार्ग सहा पदरी करण्याचे काम आजपासून सुरू होत आहे. बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
याच प्रकारे चंपारण्यासाठी दोन रेल्वे प्रकल्पांचे देखील आज भूमिपूजन करण्यात आले. मुझफ्फरपूर ते सगोली आणि सगोली ते वाल्मिकी नगर या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू होणार आहे, याचा फायदा केवळ चंपरण्यातील लोकांनाच होणार नाही तर उत्तर प्रदेश पासून नेपाळ पर्यंत लोकांचा प्रवास आणि व्यापार अधिक सुलभ आणि सुकर होईल.
मित्रांनो, चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्त आज मला एक नवीन ट्रेन सुरू करण्याची संधी मिळाली आहे. कटीहार ते जुनी दिल्ली पर्यंत ही ट्रेन चालवण्यात येणार आहे. सरकारने विशेषतः ह्या ट्रेनचे नाव ‘चंपारण्य हमसफर’ ठेवले आहे. आधुनिक सुविधांनी परिपुर्ण अशी ही ट्रेन दिल्ली पर्यंतचा तुमचा प्रवास सुकर करेल.
बंधू आणि भगिनींनो,
आज मध्यपूरा येथे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले गेले. हा कारखाना दोन कारणांसाठी महत्वाचा आहे; पहिले म्हणजे ‘मेक इन इंडिया’चे हे एक उत्तम उदाहरण आहे आणि दुसरे म्हणजे या कारखान्यामुळे या प्रदेशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतीय रेल्वे फ्रान्सच्या एका कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवत आहे. या कारखान्यात शक्तिशाली इंजिनांची निर्मिती होणार आहे. या कारखान्यात निर्माण झालेल्या 12000 हॉर्स पॉवर (एच पी) क्षमतेच्या पहिल्या इंजिनला हिरवा झेंडा दाखवण्याचे भाग्य आताच मला लाभले.
मित्रांनो, जगात असे खूप कमी देश आहेत जे माल वाहतुकीसाठी इतक्या मोठ्या क्षमतेच्या इंजिनाचा वापर करतात. या इंजिनांच्या वापरामुळे मालगाड्यांचा वेग अंदाजे दुप्पटीने वाढणार आहे.
अजून एक कारण आहे,ज्यासाठी मी ह्या प्रकल्पाविषयी तुम्हाला अजून थोडी जास्त माहिती देऊ इच्छितो. बंधू आणि भगिनींनो, 2007मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती, मंजुरी मिळाल्यानंतर 8 वर्षांपर्यंत या प्रकल्पाची कागदपत्रं धूळ खात पडली होती. 3 वर्षांपूर्वी रालोआ सरकारने या प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली आणि पहिला टप्पा पूर्ण देखील केला.
‘आयुषमान भारत’- स्वच्छतेनंतर आपल्या देशातील गरिबांचे दुसरे महत्वाचे काम आहे आरोग्य. गरीबातील गरीब कुटुंबाला, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी असेल तर तिच्या उपचारासाठी वार्षिक 5 हजार रुपये सरकार आणि विमा कंपनीकडून दिले जातील. आता पैशांच्या कमतरतेमुळे कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीच्या उपचारात अडथळा येणार नाही. आयुषमान भारत, ही नवी योजना भारत सरकार सुरू करत आहे.
माझ्या सरकारची काम करण्याची एक पद्धत आहे. आता काम रखडवणे, कागदपत्रे फिरवणे, कागदपत्रे दाबून ठेवण्याची संस्कृती संपवली आहे. सरकार आपले प्रत्येक अभियान, प्रत्येक संकल्प जनतेच्या सहकार्याने पूर्ण करत आहे. परंतु ज्या लोकांना हे बदल स्वीकारणे कठीण आहे त्यांना याचा त्रास होत आहे. गरिबांचे सशक्तीकरण त्यांना मान्य नाही. त्यांना असे वाटते की, जर गरिबांचे सशक्तीकरण झाले तर ते त्यांच्या समोर खोटं बोलू शकणार नाहीत त्यांना फसवू शकणार नाहीत. म्हणूनच अगदी रस्त्यापासून ते संसदे पर्यंत सरकारच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत.
मित्रांनो, तुमच्या समोर एक असे सरकार आहे जे जनसामान्यांना जोडण्याचे काम करत आहे; तर दुसरीकडे अशी काही लोकं आहेत हे जनमानसात दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत.
मित्रांनो, आज याप्रसंगी मी नितीशजींच्या संयमाचे आणि त्यांच्या कुशल प्रशासनाचे कौतुक करतो. बिहारमधील भ्रष्ट आणि असामाजिक शक्तीं विरोधात ते ज्या पद्धतीने लढत आहेत ती सोपी गोष्ट नाही. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या स्वच्छता अभियानाला, सामाजिक बदलांसाठी ते करत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकार संपूर्ण पाठींबा देत आहे.
‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पासोबत काम करत असलेले रालोआ सरकार संकल्पबद्ध होऊन, निश्चित वेळेत काम करत आहे. आधीच्या सरकारला वेळेचे महत्त्व पटले नाही परंतु गांधीजींनी नेहमीच सत्याग्रह आणि स्वच्छग्रहासोबतच काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यावर देखील जोर दिला. गांधीजींकडे नेहमीच एक पॉकेट घड्याळ असायचे. ते नेहमी म्हणायचे,’ जर तुम्ही तांदळाचा एक दाणा किंवा कागदाचा एक तुकडा देखील फुकट घालवत नाही तर एक मिनिट देखील फुकट का घालवायचे’. हा वेळ आपला नाही, हा वेळ देशाच्या मालकीचा आहे आणि देशाच्या कामी आला पाहिजे.
गांधीजींच्या या भावनेसह देशातील सव्वाशे कोटी लोकं अविरत काम करत आहेत. 2014 मध्ये देशातील स्वच्छतेचे प्रमाण 40% हुन कमी होते आता हे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक झाले आहे, हे देशातील लोकांच्या स्वच्छग्रहाचेच उदाहरण आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर 67 वर्षांमध्ये स्वच्छतेची जितकी काम झाली नाहीत त्याहून दुप्पट काम ह्या सरकारने केली आहेत.
मित्रांनो, गेल्या साडे तीन वर्षांमध्ये 350 हुन अधिक जिल्हे आणि साडे तीन लाखांहून अधिक गावं हगणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये देशभरात अंदाजे 7 कोटी शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ४ एप्रिल म्हणजेच, गेल्या एका आठवड्यात जेव्हा ‘सत्याग्रह से स्वच्छाग्रह’ हा आठवडा साजरा करण्यात आला तेव्हा बिहार, उत्तरप्रदेश, ओदिशा, आणि जम्मू काश्मीरमध्ये अंदाजे 26 लाख शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. या चार राज्यांनी त्यांच्या राज्यातील स्वच्छतेची व्याप्ती अधिक जलद गतीने वाढवण्याचा निश्चय केला आहे.
मित्रांनो, स्वच्छ भारत अभियानामुळे देशातील कोट्यावधी महिलांच्या आयुष्यात जे बदल झाले आहेत ते तुम्हाला माहीतच आहेत. एक शौचालय बांधल्यामुळे महिलांना सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य ह्या तिन्ही गोष्टी मिळत आहेत. आता बिहारमध्ये देखील शौचालयांना इज्जतघर म्हणून संबोधले जाते हे मला आताच सांगितले. शौचालयांच्या बांधकामुळे सामाजिक असंतुलन संपुष्टात आले आहे. यामुळे आर्थिक, सामाजिक सशक्तीकरण देखील होत आहे.
ज्या घरांमध्ये शौचालय आहे त्या कुटुंबाची वर्षाला अंदाजे 50 हजार रुपयांची बचत होते;गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे. नाहीतर हे पैसे आजारांच्या उपचारासाठी, रुग्णालयात जायला खर्च होतात.
अजून एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे की, जी गावं हागणदारीमुक्त झाली आहेत, तिथल्या मुलांमधील अतिसाराचे प्रमाण कमी झाले आहे आणि मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास देखील योग्य पद्धतीने होतं आहे. मुलं आता रोज शाळेत जातात. म्हणूनच जी गावं स्वतःला हागणदारीमुक्त घोषित करतात तिथल्या शाळांच्या निकालामध्ये सुधारणा दिसून येत आहे.
मित्रांनो, स्वच्छ भारत अभियानाने ज्याप्रकारे जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त केले आहे त्यामुळे जगातील मोठया मोठया विद्यापीठांमध्ये हा आता विशेष अभ्यासाचा विषय झाला आहे. मला वाटते की, 21 व्या शतकात मानवी स्वभाव बदलणारे असे जनआंदोलन आतापर्यंत अजून दुसऱ्या कोणत्याही देशात झाले नाही. निश्चितच भारत बदलत आहे, व्यवहार-सवयी बदलत आहेत.
BG/SP/PK
जो लोग कहते हैं कि इतिहास खुद को दोहराता नहीं है, वो यहां आकर देख सकते हैं कि कैसे 100 वर्ष पहले का इतिहास, आज फिर साक्षात, हमारे सामने खड़ा हैचंपारण की इस पवित्र भूमि पर जनआंदोलन की ऐसी ही तस्वीर सौ वर्ष पहले दुनिया ने देखी थी, और आज एक बार फिर देख रही है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
सौ वर्ष पूर्व चंपारण में देशभर से लोग आए थे, गांधी जी के नेतृत्व में गली-गली जाकर काम किया था।सौ वर्ष बाद आज उसी भावना पर चलते हुए, देश के अलग-अलग हिस्सों के आए लोगों ने, यहां के उत्साही नौजवानों, स्वच्छाग्रहियों के साथ कंधे से कंधा मिलाकर काम किया है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
चलो चंपारण के नारे के साथ, हजारों स्वच्छाग्रही यहां जुटे हैं। आपके इस उत्साह, इस उमंग, इस ऊर्जा को, राष्ट्र निर्माण के प्रति आपकी आतुरता को, बिहार के लोगों की अभिलाषा को, मैं प्रणाम करता हूं, नमन करता हूं: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
पिछले सौ वर्ष में भारत की 3 बड़ी कसौटियों के समय बिहार ने देश को रास्ता दिखाया है। जब देश गुलामी की जंजीरों में जकड़ा हुआ था, तो बिहार ने गांधी जी को महात्मा बना दिया, बापू बना दिया: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
स्वतंत्रता के बाद जब करोड़ों किसानों के सामने भूमिहीनता का संकट आया, तो विनोबा जी ने भूदान आंदोलन शुरू किया। तीसरी बार, जब देश के लोकतंत्र पर संकट आया, तो जयप्रकाश जी उठ खड़े हुए और लोकतंत्र को बचा लिया: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
मुझे बहुत गर्व है कि सत्याग्रह से स्वच्छाग्रह तक की इस यात्रा में बिहार के लोगों ने एक बार फिर अपनी नेतृत्व क्षमता को दिखाया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
Watch Live: https://t.co/wyGf7CCIt2
नीतीश जी और सुशील जी के नेतृत्व में बिहार ने जो कार्य बीते दिनों करके दिखाया है, उसने सभी का हौसला बढ़ा दिया है। बिहार एक मात्र ऐसा राज्य था, जहां स्वच्छता का दायरा 50% से कम था। लेकिन मुझे बताया गया कि एक हफ्ते के स्वच्छाग्रह अभियान के बाद बिहार ने इस बैरियर को तोड़ दिया: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
पिछले एक हफ्ते में बिहार में 8 लाख 50 हजार से ज्यादा शौचालयों का निर्माण किया गया है। ये गति और प्रगति कम नहीं है। मैं बिहार के लोगों को, प्रत्येक स्वच्छाग्रही को और राज्य सरकार को इसके लिए बहुत-बहुत बधाई देता हूं: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
आज जिन योजनाओं का शिलान्यास किया गया, उनमें मोतिहारी झील के जीर्णोधार का प्रोजेक्ट भी शामिल है। हमारा मोतिहारी शहर, जिस झील के नाम पर जाना जाता है, जो चंपारण के इतिहास का हिस्सा है, उसके पुनरुद्धार का कार्य आज से शुरु हो रहा है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
स्वच्छता का संबंध पानी से भी है। बेतिया को पीने के साफ पानी के लिए जूझना ना पड़े, इसके लिए अमृत योजना के तहत तकरीबन 100 करोड़ रुपए की लागत से वॉटर सप्लाई योजना का शिलान्यास किया है। इसका सीधा लाभ डेढ़ लाख से ज्यादा लोगों को मिलेगा: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
घर या फैक्ट्री के गंदे पानी को गंगा में जाने से रोकने के लिए बिहार में अब तक 3 हजार करोड़ से ज्यादा के 11 प्रोजेक्ट की मंजूरी दी जा चुकी है। इस राशि से 1100 किलोमीटर से लंबी सीवेज लाइन बिछाने की योजना है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
गंगा तट के किनारे बने गांवों को प्राथमिकता के आधार पर खुले में शौच से मुक्त बनाया जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
गंगा किनारे बसे गांवों में कचरे के प्रबंधन की योजनाएं लागू की जा रही हैं ताकि गांव का कचरा नदी में ना बहाया जाए। जल्द ही गंगा तट पूरी तरह खुले में शौच से मुक्त हो जाएगा: PM
स्वच्छ ईंधन पर जोर और उज्जवला योजना की सफलता की वजह से सिलेंडर की मांग भी बढ़ी है। चंपारण और आसपास के लोगों को गैस सिलेंडर की दिक्कत ना हो, इसके लिए मोतिहारी और सुगौली में LPG प्लांट लगाने के प्रोजेक्ट्स का आज शिलान्यास आज किया गया है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
आज लगभग 900 करोड़ रुपए के नेशनल हाईवे प्रोजेक्ट का शिलान्यास किया गया है। औरंगाबाद से चोरदहा का जो सेक्शन अभी 4 लेन का है, उसे 6 लेन बनाने का काम आज से शुरू हो रहा है। ये प्रोजेक्ट बिहार और झारखंड, दोनों राज्यों के लोगों को फायदा पहुंचा पहुंचाएगा: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
चंपारण सत्याग्रह के सौ वर्ष के अवसर पर मुझे एक नई ट्रेन का शुभारंभ करने का भी अवसर मिला है। ये ट्रेन कटिहार से पुरानी दिल्ली तक चला करेगी। इसका नाम विशेष रूप से चंपारण हमसफर एक्सप्रेस रखा है। आधुनिक सुविधाओं से लैस ये ट्रेन, दिल्ली आने-जाने में आपके लिए बहुत मददगार साबित होगी: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
आज मधेपुरा में इलेक्ट्रिक लोकोमोटिव फैक्ट्री के फेज वन का भी लोकार्पण किया गया है। ये फैक्ट्री दो कारणों से अहम है। एक तो ये मेक इन इंडिया का उत्तम उदाहरण है, और दूसरा, ये इस क्षेत्र में रोजगार का भी बड़ा माध्यम बन रही है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
एक और वजह है जिसकी वजह से मैं आपको इस प्रोजेक्ट के बारे में थोड़ा विस्तार से बताना चाहता हूं। इस प्रोजेक्ट को 2007 में मंजूरी दी गई थी। मंजूरी के बाद 8 साल तक इसकी फाइलों में पावर नहीं आ पाई। 3 साल पहले एनडीए सरकार ने इस पर काम शुरू करवाया और अब पहला फेज पूरा भी कर दिया है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
गांधी जी की इसी भावना को जीते हुए, सवा सौ करोड़ देशवासी मिशन मोड पर काम कर रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
ये उनका स्वच्छाग्रह ही है कि 2014 में स्वच्छता का जो दायरा 40 प्रतिशत से भी कम था, वो अब बढ़कर 80 प्रतिशत से भी ज्यादा हो चुका है: PM
ये लोगों की इच्छाशक्ति ही है कि 4 अप्रैल, यानि पिछले एक हफ्ते में , जिस दौरान सत्याग्रह से स्वच्छाग्रह सप्ताह मनाया गया है, बिहार, यूपी, ओडिशा और जम्मू-कश्मीर में लगभग 26 लाख शौचालयों का निर्माण किया गया है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
स्वच्छ भारत अभियान ने देश की करोड़ों-करोड़ महिलाओं की जिंदगी जिस तरह बदली है, उससे आप भली-भांति परिचित हैं। एक शौचालय के निर्माण से महिला को सम्मान, सुरक्षा और स्वास्थ्य, तीनों मिल रहा है। मुझे बताया गया है कि अब तो बिहार में भी शौचालयों को ‘इज्जत घर’ कहकर बुलाया जाने लगा है: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018
गांधी जी ने यहां चंपारण में किसान, श्रमिक, शिक्षक, वकील, डॉक्टर-इंजीनियर सभी को एक ही पंक्ति में ला खड़ा किया था। स्वच्छाग्रही के नाते हमारा रोल भी वैसा ही होना चाहिए। स्वच्छता का ये संदेश समाज के हर व्यक्ति, हर तबके तक पहुंचे, ऐसी हमारी कोशिशें होनी चाहिए: PM
— PMO India (@PMOIndia) April 10, 2018