नवी दिल्ली, 19 मार्च 2025
बिल गेट्स यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बिल गेट्स यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत भारताचा विकास, विकसित भारत 2047 चा मार्ग तसेच आरोग्य, कृषी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इतर क्षेत्रांमध्ये होत असलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर विस्तृत चर्चा झाली.
भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे :
“नेहमीप्रमाणेच, बिल गेट्स यांच्यासोबत एक फलदायी चर्चा झाली. भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि शाश्वत विकास यांसारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.”
As always, an excellent meeting with Bill Gates. We spoke about diverse issues including tech, innovation and sustainability towards making a better future for the coming generations. https://t.co/XLZ86wDILA
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2025
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai