पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भुवनेश्वर येथील बिजू पटनायक विमानतळावरील रस्ता रुंदीकरणासाठी भारतीय विमान प्राधिकरण आणि ओदिशा सरकार यांच्यात जमिनीच्या आदान-प्रदानाला मंजुरी दिली. त्यानुसार 1.6 एकर जमिनीची देवाणघेवाण केली जाणार आहे. या देवाणघेवाणीसंदर्भात द्विपक्षीय सहमती झाल्यानंतर मंत्रिमंडळाने त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था आणि सार्वजनिक वापरासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध व्हावी यासाठी ओदिशा सरकार भुवनेश्वर विमानतळाजवळच्या या रस्त्याचे रुंदीकरण करणार आहे.
B.Gokhale/M.Pange/P.Kor