Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाली येथील G-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

बाली येथील G-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली.

इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी मेलोनी यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, दहशतवादविरोधी कार्य आणि  परस्पर संबंध यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचार विनिमय केला.

भारत-इटली राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या G-20 शिखर परिषदेसाठी मेलोनी यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान मोदी उत्सुक आहेत.

 

S.Patil/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai