Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाली येथील G-20 शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

बाली येथील G-20 शिखर परिषदे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान सुनक यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.

भारत-ब्रिटनमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी आणि दोन्ही देशांमधील भविष्यातील संबंधांविषयीचा आराखडा 2030 च्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. G20 आणि राष्ट्रकुल सारख्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांवर एकत्र काम करण्याची इच्छा दोन्ही नेत्यांनी बोलून दाखवली. यावेळी व्यापार, गतिशीलता, संरक्षण आणि सुरक्षा यासारख्या सहकार्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर देखील चर्चा झाली.

 

S.Patil/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai