‘बायकिंग क्विन्स’ या गुजरातमधल्या मोटारसायकल स्वार 50 महिलांच्या पथकाने आज नवी दिल्लीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
आपण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 10 हजार किलो मीटरपेक्षा जास्त प्रवास केला असून, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छ भारत यासारख्या सामाजिक मुद्यांवर जनतेशी संवाद साधल्याचे या पथकाने म्हटले आहे. 15 ऑगस्ट 2017 रोजी त्यांनी लडाख मधल्या खारदुंगला इथे तिरंगा फडकावला.
पंतप्रधानांनी या पथकाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पुढच्या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
Met a group of women bikers, who spoke about their biking expedition across parts of India. https://t.co/B5ELXtuSfD
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2017