Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधान उपस्थित

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधान उपस्थित

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधान उपस्थित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौ येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, एकीकडे एकविसाव्या शतकात युवकांच्या ऊर्जेने ओतप्रोत आणि तरुणांच्या स्वप्नांचा देश म्हणून भारताचा उदय होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. ते म्हणाले की युवक हा भारताच्या सामर्थ्याचा स्रोत आहे.

तर दुसरीकडे, हैदराबादमध्ये एका विद्यार्थ्याने अलिकडेच केलेल्या आत्महत्येचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले. की त्या कुटुंबाचे दु:ख आपण समजू शकतो. कारण कोणतेही असेल, मात्र एका मातेने तिचा पुत्र गमावला आहे, खरेच भारतमातेने एक पुत्र गमावला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर आपले सरकार चालत राहिल आणि समस्यांचे निराकरण होईल असे वातावरण निर्माण करण्यासाठी काम करेल असे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकर यांच्या आर्थिक दूरदृष्टीची आठवण करुन दिली. ते म्हणाले की नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी निर्माण करणाऱ्या युवकांचा विकास करण्यासाठी सरकार काम करत आहे.

डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिले आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादनकेले याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की डॉ. आंबेडकरांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि आपले आयुष्य समाजाच्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी समर्पित केले. युवकांनी डॉ. आंबेडकरांचे उदाहरण डोळयासमोर ठेवावे आणि गरीब आणि वंचितांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी विद्यापीठातील अद्ययावत विद्यार्थी कला केंद्राचे भूमीपूजन केले.

S.Kane/S.Tupe/M.Desai