Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमास पंतप्रधानांची उपस्थित

बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमास पंतप्रधानांची उपस्थित


पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यादरम्यान, बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . बांग्लादेशचे राष्ट्रपती महामहीम महंमद अब्दुल हामीद, पंतप्रधान महामहीम शेख हसीना, शेख मुजिब्बुर रहमान यांच्या कनिष्ठ कन्या शेख रेहाना, मुजीब बोर्शो उत्सवासाठीचे राष्ट्रीय अंमलबजावणी समितीचे मुख्य समन्वयक डॉ. कमाल अब्दुल नासीर चौधरी आणि अन्य मान्यवरांसह  यावेळी मोडी यांच्या समवेत उपस्थित होते. तेजगांव येथे नॅशनल परेड स्क्वेअर येथे हा कार्यक्रम झाला. बांग्लादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीवर्ष  सोहळ्याची सुरुवात  यावेळी करण्यात आले.

 PM India

या सोहळ्याचा प्रारंभ पवित्र कुराण, भगवद् गीता, त्रिपिठीका आणि बायबलमधील निवडक वचनांचे पठण करून करण्यात आला.बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बनवलेल्या विशेष लोगोचे अनावरण करून “द इटर्नल मुजीब“ या नावाचा व्हिडिओ सादर करण्यात आला. हा विशेष सोहळा साजरा करण्याच्या निमित्ताने एक थीम साँग (कार्यक्रमास अनुरूप असलेले गीत) सादर करण्यात आले. “द इटर्नल मुजीब“ या विषयावर तयार केलेला अनिमेशन व्हिडिओ देखील या सोहळ्या दरम्यान दाखविण्यात आला. बांग्लादेशच्या राष्ट्र उभारणीमध्ये येथील सशस्त्र सैन्याची असलेली भूमिका सैन्याने केलेल्या विशेष सादरीकरणामधून यावेळी मांडण्यात आली.

 

डॉ. कमाल अब्दुल नासीर चौधरी यांनी आपल्या  स्वागतपर भाषणात, पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीचा आणि 1971 च्या बांग्लादेशच्या मुक्ती संग्रामात थेट सहभाग असलेल्या भारताच्या सशस्त्र सैन्य दलाचा विशेष उल्लेख केला. विविध  देशांच्या आणि राज्यांच्या प्रमुखांकडून आलेले  तसेच सन्माननीय व्यक्तींनि पाठवलेले  अभिनंदन संदेश यावेळी दाखविण्यात आले.

 

गांधी शांतता पुरस्कार 2020 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेख मुजीबूर रहमान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला, तो शेख मुजीबूर रहमान यांच्या कनिष्ठ कन्या शेख रेहाना यांनी त्यांच्या भगिनी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह स्वीकारला. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी शेख मुजीबूर रहमान यांनी अहिंसा  आणि अन्य गांधीवादी पद्धतींच्या माध्मातून केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता .

 PM India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या प्रसंगाचे महत्त्व विषद महत्वाच्या प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध बाबींवर प्रकाश टाकला. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना `इटर्नल मुजीब मोमेन्टो` प्रदान केला.

 PM India

बांग्लादेशचे राष्ट्रपती, महंमद अब्दुल हमीद यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि भारतीय नागरिक तसेच १९७१ च्या बांग्लादेश मुक्ती संग्रामातील भारताची भूमिका आणि त्यासाठी घेतले गेलेले परीश्रम या विषयी आभार व्यक्त केले.

 

कोविड १९ महामारीचा काळ सुरू असतानाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यासाठी आवर्जून प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली याबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी  त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांचे मनापासून आभार मानले. सगळ्या काळात बांग्लादेशला भारत सरकारने नेहमीच दिलेल्या पाठिंब्याबद्दल कौतुक व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचा औपचारिक समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. भारतीय शास्त्रीय संगीतातील नामवंत गायक पं. अजय चक्रवर्ती, यांनी तयार केलेली आणि बंगबंधूंना समर्पित केलेली रागरचनेच्या सादरीकरणामुळे  उपस्थित मान्यवर  आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले . ए. आर. रहमान यांच्या सुरेल सादरीकरणानेही  अनेकांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप अनेक सांगितिक, नृत्य आणि रंगमंचीय आविष्कारांनी झाला.

 

…………