Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बांग्लादेशच्या पंतप्रधानांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान भारत -बांग्लादेश संयुक्त निवेदन


  1. भारताचे पंतप्रधान महामहीम नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार बांग्लादेशच्या पंतप्रधान महामहीम शेख हसीना यांचा अधिकृत भारत दौरा  05 ऑक्टोबर 2019 रोजी सुरु झाला. नवी दिल्लीतील अधिकृत कार्यक्रमांव्यतिरिक्त पंतप्रधान शेख हसीना यांना  03-04 ऑक्टोबर 2019 रोजी जागतिक आर्थिक मंचाने आयोजित केलेल्या भारत आर्थिक शिखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून देखील निमंत्रित करण्यात आले होते.
  2. दोन्ही पंतप्रधानांनी सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी या दौऱ्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या द्विपक्षीय सामंजस्य  कराराच्या आदानप्रदान समारंभाचे अध्यक्षपद भूषवले आणि तीन द्विपक्षीय प्रकल्पांचे व्हिडिओलिंकद्वारे उद्‌घाटनही केले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या उत्कृष्ट स्थितीबद्दल समाधान व्यक्त केले, जे दृढ ऐतिहासिक संबंध  आणि बंधुभावावर आधारित आहेत. सार्वभौमत्व, समता, विश्वास आणि सामंजस्यपूर्ण भागीदारीपलीकडे जाणाऱ्या  धोरणात्मक भागीदारीत ते प्रतिबिंबित होतात. त्यांनी यशस्वी आणि सर्वसमावेशक चर्चा केली. या दरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व बाबींचा आढावा घेतला आणि प्रादेशिक  मुद्यांबाबत विचार व्यक्त केले. पारंपरिक आणि अपारंपरिक क्षेत्रांमध्ये परस्पर लाभाची भागीदारी करण्यासाठी विविध संधींचा पूर्ण वापर करायला आणि या अपरिवर्तनीय भागीदारीमुळे बांगलादेशच्या मुक्ती संग्रामापासून सुरू असलेला हा वारसा वृद्धिंगत होईल हे सुनिश्चित करण्याबाबत दोन्ही पंतप्रधानांनी सहमती दर्शविली. 
  3. भारत आणि बांगलादेश – धोरणात्मक संबंध ओलांडणारे बंध दोन्ही पंतप्रधानांनी इतिहास, संस्कृती, भाषा, धर्मनिरपेक्षता आणि इतर वैशिट्यपूर्ण बाबी दर्शवणाऱ्या भागीदारीच्या सामायिक बंधांचे समरण केले. 1971च्या मुक्ती संग्रामातील मुक्तीयोद्ध्यास, या युद्धात लढलेल्या भारतीय सैनिकांना आणि बांग्लादेशच्या नागरिकांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली. आणि लोकशाही आणि  समानता या मूल्यांच्या प्रति बांगलादेशी नेतृत्वाच्या प्रतिबद्धतेला अभिवादन केले. बांग्लादेशचे राष्ट्रपिता, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या स्वप्नांच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांनी ही सामायिक मूल्ये टिकवून ठेवण्याची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींनी समृद्ध, शांततापूर्ण आणि विकसित बांगलादेश सुनिश्चित करण्याचे पंतप्रधान शेख हसीना यांचे स्वप्न  साकार करण्यासाठी भारताच्या पूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरूद्ध बांगलादेश सरकारच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणाचे कौतुक केले आणि या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. दोन्ही देश आणि प्रदेशाच्या शांतता आणि स्थिरतेला दहशतवादाचा सर्वात महत्वाचा धोका आहे हे ओळखून, दोन्ही पंतप्रधानांनी सर्व प्रकारचा आणि सर्व स्तरातील दहशतवाद दूर करण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि कोणत्याही दहशतवादी कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही, असे म्हटले. दोन्ही नेत्यांनी ऑगस्ट 2019 मध्ये बांगलादेशच्या गृहमंत्र्यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी दोन्ही देशांच्या गृहमंत्र्यांमधील यशस्वी चर्चेचा संदर्भ दिला आणि अतिरेकी आणि कट्टरपंथी गट, दहशतवादी, तस्कर, बनावट चलन तस्करी आणि संघटित गुन्हेगारीविरोधात सहकार्य करण्याला सामायिक प्राधान्य देण्याबाबत सहमती दर्शवली.
  2. दोन्ही देशांमधील लोकांचे येणे-जाणे सुलभ करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. रस्ते किंवा रेल्वेमार्गाने प्रवास करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी प्रवासाची सुविधा सुलभ करण्याच्या वचनबद्धतेबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि प्रतिस्पर्ध्याच्या भावनेनुसार विद्यमान भू-बंदरे वापरणाऱ्या बांगलादेशी प्रवाशांसाठी सर्व निर्बंध हटवावेत अशी मागणी केली.  अखाउरा (त्रिपुरा) आणि घोजाडंगा (पश्चिम बंगाल) येथील चौक्या सुरू करून वैध कागदपत्रांवर प्रवास करणाऱ्या बांगलादेशातील नागरिकांना भारतातील भू-बंदरातून प्रवेश / बाहेर पडण्यावरील उर्वरित निर्बंध टप्प्याटप्प्याने काढले जातील यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.
  3. शांत , स्थिर आणि गुन्हेगारी मुक्त सीमा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी सीमा व्यवस्थापनाच्या महत्वावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. या उद्दीष्टाच्या दिशेने दोन्ही, नेत्यांनी त्यांच्या संबंधित सीमा दलांना लवकरात लवकर दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या सर्व प्रलंबित क्षेत्रांमध्ये सीमा कुंपण घालण्याचे निर्देश दिले. दोन्ही नेत्यांनी हे देखील मान्य केले की सीमेवरील जीवितहानी हा चिंतेचा विषय आहे आणि अशा घटना शून्यावर आणण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी समन्वयित उपाययोजना वाढविण्याचे निर्देश संबंधित सीमा दलांना दिले.
  4. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. आपत्ती व्यवस्थापन सहकार्याच्या क्षेत्रात कालबद्ध पद्धतीने सामंजस्य करार लवकर पूर्ण करण्याच्या गरजेचे त्यांनी स्वागत केले.

समसमान व्यापार भागीदारीच्या दिशेने

  1. एलडीसीच्या दर्जातून बाहेर येणाऱ्या बांगलादेशचे स्वागत करत भारताने बांगलादेशचे कौतुक केले.  या संदर्भात, भारत आणि बांगलादेश यांच्यात द्विपक्षीय व्यापक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) होण्याची शक्यता लक्षात घेऊन  संयुक्त अध्ययन मंडळाच्या कार्यान्वयनाला गती देण्याबाबत दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली.
  2. अखौरा-अगरतला बंदरातून व्यापार  होणाऱ्या उत्पादनांवरील बंदर निर्बंध मागे घेण्याच्या भारताच्या विनंतीला उत्तर देताना बांगलादेशने सांगितले की, नजीकच्या काळात नियमित व्यापाराच्या बऱ्याच वस्तूंवरचे  निर्बंध हटविले जातील.
  3. बांगलादेशच्या वतीने भारतीय अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली की बांगलादेशातून भारतात निर्यात होणाऱ्या ज्युटसह विविध उत्पादनांवर लावण्यात आलेल्या अँटी-डंपिंग / एन्टी-प्रिडेंशन शुल्काच्या मुद्याकडे लक्ष देण्याबाबत विचार करावा. भारताच्या बाजूने नमूद करण्यात आले की विद्यमान कायद्यांनुसार व्यापार सुधारणेबाबत तपासणी केली जाते. या क्षेत्रातील सहकार्य आणि क्षमता वाढविण्यासाठी व्यापार उपाययोजनांच्या क्षेत्रात सहकार्याच्या चौकटीची स्थापना वेगवान करण्याचे निर्देश दोन्ही नेत्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले.
  4. सीमेवरच्या दुर्गम भागातील रहिवाशांच्या जीवनावर आणि त्यांच्या उपजिविकेवर सीमेवरच्या बाजारांचा सकारात्मक परिणामाचे कौतुक करीत नेत्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना बारा सीमा हाटची  स्थापना त्वरित करण्याचे निर्देश दिले ज्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे.
  5. बांगलादेश मानके  आणि चाचणी संस्था (बीएसटीआय) आणि भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) यांच्यातल्या  सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाचेही नेत्यांनी स्वागत केले. हा  सामंजस्य करार दोन देशांमधील वस्तूंचा व्यापार संतुलित पद्धतीने वाढविण्यात मदत करेल याबाबत त्यांची सहमती झाली. दोन्ही देशांनी अनुक्रमे बीएबी आणि एनएबीएलच्या परस्पर मान्यता प्रमाणपत्राबाबत विचार करण्यास सहमती दर्शविली कारण दोन्ही देश आशिया पॅसिफिक प्रयोगशाळेच्या मान्यता सहकार्याचे सामायिक सदस्य आहेत आणि बीएसटीआयने एनएबीएल मानकांशी सुसंगत काही सुविधा स्थापित करण्याचे काम सुरू केले आहे.
  6. पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतीय बाजारात बांगलादेशी निर्यातीसाठी शुल्क मुक्त व कोटा मुक्त प्रवेश देण्याच्या भारताच्या तत्परतेचे कौतुक केले. 2019 मध्ये बांगलादेशातून निर्यातीने  पहिल्यांदाच एक अब्ज डॉलरचा आकडा ओलांडला आणि त्यावर्षी निर्यातीत  झालेल्या 52% वाढीचे त्यांनी स्वागत केले.
  7. दोन्ही देशांच्या वस्त्रोद्योग व जूट क्षेत्रातील सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक पाऊल म्हणून पंतप्रधानांनी वस्त्रोद्योग मंत्रालय,भारत सरकार आणि वस्त्र व ज्यूट मंत्रालय, बांगलादेश सरकार यांच्यात सामंजस्य करार लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले.

संपर्क वाढवणे – जमिनीवर, पाण्यावर, आकाशात

  1. दोन्ही देशांनी ओळखले की हवाई, पाणी, रेल्वे, रस्ते या माध्यमातून संपर्क वाढवल्यास  बांगलादेश आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधील आणि त्यापलीकडे  आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी परस्पर हिताच्या संधी मिळतात. नेत्यांनी चॅटोग्राम आणि मुंगला बंदरांच्या मालवाहतुकीसाठी आणि विशेषत: उत्तर-पूर्वेकडील भारत आणि तेथून मालाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मानक परिचालन प्रक्रियेच्या समाप्तीचे स्वागत केले, जे दोन्ही अर्थव्यवस्थेसाठी विजयाची समान परिस्थिती निर्माण करू शकेल.
  2. दोन्ही नेत्यांनी आंतरदेशीय जल आणि किनारपट्टीवरील नौवहन व्यापाराचा वापर करून मालवाहतूक करण्याची अपार संधी अधोरेखित केल्या. त्या दिशेने, त्यांनी आंतरदेशीय जल संक्रमण आणि व्यापार प्रोटोकॉल अंतर्गत धुलिअन-गदागरी-राजशाही-दौलदडिया-अरिचा मार्ग कार्यान्वित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले, दौंडकंडी-सोनमुरा मार्ग  अंतर्गत समाविष्ट केले.
  3. परस्पर मालवाहतुकीसाठी एकमेकांच्या बंदरातील मोठ्या प्रमाणात वापर केल्याने दोन्ही अर्थव्यवस्थांना होणारे संभाव्य फायदे लक्षात घेऊन दोन्ही बाजूंनी आवश्यक पध्दतींवर त्वरित चर्चा करण्यास सहमती दर्शविली.
  4. दोन्ही देशांदरम्यान प्रवाशांची आणि वस्तूंची वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि उत्तम संपर्क व्यवस्था देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी इच्छुक व सज्ज असलेल्या सदस्य देशांमध्ये वस्तू आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बीबीआयएन मोटर वाहन कराराचे लवकर कार्यान्वयन करण्यास सहमती दर्शविली; किंवा योग्य द्विपक्षीय भारत-बांग्लादेश मोटर वाहन कराराच्या दिशेने कार्य करणे.
  5. दोन्ही देशांमधील रस्ते संपर्क वाढविण्यासाठी पुढील टप्पा म्हणून, दोन्ही नेत्यांनी ढाका-सिलीगुडी बस सेवा सुरू करण्याच्या योजनांचे स्वागत केले.
  6. दोन्ही देशांच्या जलसंपदा सचिवांमधील आणि त्यानंतर संयुक्त तंत्र समितीची स्थापना तसेच प्रस्तावित गंगेचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी संदर्भाच्या अटी तयार करण्याबाबत ऑगस्ट 2019 मध्ये ढाका येथे झालेल्या चर्चेवर दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. गंगा जल वाटप 1996 नुसार बांगलादेशला प्राप्त झालेल्या पाण्याच्या चांगल्या वापरासाठी बांगलादेशातील पद्म बॅरेज प्रकल्प.
  7. दोन्ही नेत्यांनी संयुक्त नद्या आयोगाच्या तांत्रिक पातळीवरील समितीला तातडीने अद्ययावत डेटा व माहितीची देवाणघेवाण करण्यास तसेच मनु, मुहुरी, खोवाई, गुमटी, धारला व दूधकुमार या सहा नद्यांसाठी अंतरिम वाटप कराराच्या प्रारूप आराखडे तयार करण्याचे व फेनी नदीच्या अंतरिम वाटणीच्या कराराच्या मसुद्यावर ठाम राहण्याचे निर्देश दिले.
  8. 2011 मध्ये दोन्ही सरकारांनी सहमती दर्शविल्यानुसार बांगलादेशातील लोक तीस्ताच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी अंतरिम कराराच्या लवकर स्वाक्षरी आणि अंमलबजावणीची प्रतीक्षा करीत आहेत,असे पंतप्रधान शेख हसीना यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, त्यांचे सरकार सर्व भागधारकांसह शक्य तितक्या लवकर कराराच्या समाप्तीसाठी काम करत आहे.
  9. त्रिपुराच्या सबरूम शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या उद्देशाने फेणी नदीतून 1.82 क्युसेक पाणी  घेण्याच्या कामाची लवकर सुरूवात करण्यासाठी ढाका येथे झालेल्या जलसंपदा सचिव स्तरावरील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचे दोन्ही नेत्यांनी कौतुक केले.
  10. दोन्ही नेत्यांनी रेल्वे क्षेत्रातील दोन्ही देशांमधील सहकार्याची  अपार क्षमता ओळखली. ऑगस्ट 2019 मध्ये दोन्ही देशांच्या रेल्वे मंत्र्यांमधील विधायक चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
  11. दोन्ही नेत्यांनी लोकांमधील संपर्क वाढविण्याच्या गरजेवर भर दिला. एक पाऊल पुढे टाकत दोन्ही पंतप्रधानांनी मैत्री एक्सप्रेसची वारंवारता दर आठवड्याला 4 वरून पाच वेळा आणि बंधन एक्सप्रेसची दर आठवड्याला 1 वरून 2 पर्यंत वाढवण्याचे स्वागत केले.
  12. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशात रेल्वेद्वारे रोलिंग स्टॉक पुरवठा करण्याच्या पद्धती पूर्ण करण्याला आणि बांगलादेशमधील सैदपूर कार्यशाळेच्या आधुनिकीकरणाचे  कामकाज वेगवान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.आहेत.
  13. अनुदान तत्वावर बांगलादेशला अनेक ब्रॉडगेज आणि मीटर गेज इंजिन पुरवठा करण्याबाबत विचार केल्याबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढविण्यात मदत होईल.
  14. यावर्षीच्या उन्हाळी वेळापत्रकापासून सध्याच्या दर आठवड्याच्या 61 विमान सेवांची संख्या 91 पर्यंत वाढवण्याच्या तसेच हिवाळी वेळापत्रकात त्यांची संख्या 120 पर्यंत नेण्याच्या निर्णयाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

संरक्षण सहकार्य अधिक बळकटी आणणार

  1. डिसेंबर,1971 मध्ये झालेल्या बांगलादेश मुक्त संग्रामामध्ये उभय देशांच्या लष्करी कारवाईनंतर या लढ्याचा उल्लेखनीय इतिहास लक्षात घेवून ‘सुरक्षित शेजार’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अधिकाधिक सहकार्य कायम राखण्याची गरज उभय नेत्यांनी मान्य केली.
  2. दोन्ही पंतप्रधानांनी सागरी सुरक्षा क्षेत्रामध्ये भागीदारी अधिक विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे,त्याचे स्वागत केले. बांगलादेशामध्ये सागरी दक्षता राखणारी रडार यंत्रणा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याच्या प्रगतीची नोंद घेवून हा करारावर लवकरच स्वाक्षरी करण्यासाठी उभय बाजूंना प्रोत्साहन दिले. 
  3. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या संरक्षण रेषेचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यासंबंधी एप्रिल 2019 मध्ये 500 दशलक्ष अमेरिकी डाॅलर खर्चाच्या आराखड्याला मान्यता देवून   त्यानुसार अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला होता.  

विकास कामांमध्ये संकलित सहकार्य.

  1. बांगलादेशातल्या तळागळातल्या समाजाच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देण्याच्या हेतूने भारताने जी मदत देवू केली आहे,त्याबद्दल बांगलादेशाच्या पंतप्रधान हसीना यांनी भारत सरकारचे आभार मानले. भारताच्या सहकार्याने ‘उच्च प्रभाव सामुदायिक विकास प्रकल्प’ (एचआयसीडीपी) हाती घेण्यात आले आहेत.
  2. दोन्ही पंतप्रधानांनी‘लाईन ऑफ क्रेडिट’च्या वापरांसंबंधी जी प्रगती नोंदवली गेली आहे, त्याविषयी समाधान व्यक्त केले. तसेच हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी उभय देशांच्या संबंधित अधिकारी वर्गाला आवश्यक ते निर्देश देण्यात आले.
  3. ढाकामधल्या एक्झिम बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी कार्यालयाचे कार्य सुलभतेने व्हावे,यासाठी तयार केलेल्या आराखडा करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल उभय बाजूंनी समाधान व्यक्त केले.
  4. व्दिपक्षीय विकास भागीदारीतून उभारण्यात आलेल्या तीन प्रकल्पांचे उद्‌घाटन दोन्ही नेत्यांनी दि. 5 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ लिंक च्या माध्यमातून केले.

अ – बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात करणे.

ब – रामकृष्ण मिशन, ढाका इथं ‘विवेकानंद भवन’ या विद्यार्थी वसतिगृहाचे उद्‌घाटन केले.

क – खुलना इथल्या इन्स्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनीअर्स बांगलादेश या संस्थेमध्ये बांगलादेश-भारत व्यावसायिक कौशल्य विकास संस्थेचे (बीआयपीडीआय) उद्‌घाटन केले.

  1. बांगलादेशातल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वृद्धीसाठी व्दिपक्षीय सहकार्याने योजना राबवल्याबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले. भविष्यात भारत सरकारच्यावतीने बांगलादेशातल्या न्यायसंस्थेत कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गासाठी जास्त संख्येने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दिशेने काम करण्यात येणार आहे. 

 सीमेपार ऊर्जा सहकार्य.

  1. दोन्ही देशांनी सीमापार ऊर्जा व्यापार सहकार्याला चालना देण्याचा निर्णय घेतला. याचाच भाग म्हणजे बांगलादेश ते त्रिपुरा राज्यापर्यंत एलपीजीचा ट्रक्सच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येणार आहे.
  2. ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सहकार्य करण्यासंबंधी ढाका इथं नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आलेल्या कराराचे स्वागत केले. संयुक्त सचिव समितीच्या 17 व्या बैठकीत कटिहार (भारत),परबोटीपूर (बांगलादेश) आणि बोरनगर (भारत) यांच्या दरम्यान दुहेरी सर्किट तयार करून सीमेपार ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करार केला. या कराराची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याचे कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. यामुळे भारत, नेपाळ आणि भूतानमधील जल विद्युत ऊर्जा प्रकल्पांतून मिळणा-या स्पर्धात्मक किंमतीला वीज उपलब्ध होवू शकेल. तसेच आंतर-प्रादेशिक ऊर्जा व्यापार अधिक सक्षम होईल.

शिक्षण आणि युवा देवाणघेवाण

  1. भविष्यातली गुंतवणूक म्हणून दोन्ही देशातल्या युवकांमध्ये सहकार्य वाढीला महत्व देण्यात येणार आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. रचनात्मक प्रशिक्षण कार्यक्रमामुळे उत्पादकता वाढू शकेल,हे दोन्ही नेत्यांनी जाणून त्यासाठी नवीन योजना आखण्यात येतील.
  2. शैक्षणिक पात्रतेच्या परस्पर मान्यते विषयीचा सामंजस्य करार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उभय देशाच्या नेत्यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिले.

सांस्कृतिक सहकार्य – महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती (2019) आणि बंगबंधूची जन्मशताब्दी (2020)त्याच बरोबर बांगलादेश मुक्ती युद्धाचे 50 वर्ष (2021)

  1. उभय नेत्यांनी या दोन्ही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांच्या वर्धापन दिन वर्षात त्यांच्या स्मरणार्थ अधिक सहकार्य करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. 2020 मध्ये बंगबंधू शेख मुजिबूर रहमान  यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. तसेच 2021 मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामाला आणि भारत-बांगलादेश व्दिपक्षीय संबंध स्थापनेला 50 वर्षे होत आहेत. या  दोन्ही ऐतिहासिक वर्षांच्या स्मरणार्थ दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करून संवाद वृद्धी करण्यास सहमती दर्शवली. बांगलादेशात भारतीय महोत्सवाचे आयोजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी भारतीय पंतप्रधानांचे आभार मानले. हा महोत्सव परस्परांच्या सोईनुसार 2019 -2020 मध्ये आयोजित करण्यात येईल. 
  2. सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमाविषयी सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले,त्याचे उभय पंतप्रधानांनी स्वागत केले.
  3. बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2020मध्ये रहमान यांच्यावर चित्रपटाची सह-निर्मिती करण्याचे निर्देश‘एनएफडीसी’ आणि ‘बीएफडीसी’च्या अधिकारी वर्गाला देण्यात आले.

44.वसाहतवाद, असमानता यांच्या विरोधात अंहिसेच्या मार्गाने संघर्ष करण्याचे तत्वज्ञान देणा-या महात्मा गांधीजींची यंदा 150वी जयंती आहे, यानिमित्त त्यांचे स्मरण करण्यासाठी टपाल तिकीट जारी करण्यास सहमती दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश सरकारचे आभार मानले. 

  1. राष्ट्रीय संग्रहालय (भारत) आणि बंगबंधू संग्रहालय (बांगलादेश) यांच्यामध्ये सहकार्य करण्याच्या सांमजस्य कराराला दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यासंबंधी लवकरच सामंजस्य कराराला अंतिम स्वरूप देण्याचे निर्देश संबंधितांना दिले. 

म्यानमारच्या राखिन प्रांतातून विस्थापित झालेल्या लोकांविषयी चर्चा 

  1. म्यानमारच्या राखिन या प्रांतामधून विस्थापित झालेल्या नागरिकांना मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करण्याचा बांगलादेशाने जो उदारपणा दाखवला,त्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे, त्यांना बांगलादेश करत असलेल्या मदतीला सहकार्य म्हणून भारतही सामुग्री पावठवत आहे. ही मदत घेवून जाणारी भारताची पाचवी तुकडी आता बांगलादेशात पोचणार आहे. या मदत साहित्यामध्ये तंबू, बचाव साहित्य तसेच म्यानमारमधून विस्थापित झालेल्या महिलांच्या कौशल्य विकासासाठी एक हजार शिलाई यंत्रे यांचा समावेश आहे. याशिवाय म्यानमारच्या राखिन प्रांतामध्ये 250 घरकुले बांधून देण्याचा पहिला प्रकल्प भारताने पूर्ण केला आहे. आता या क्षेत्रामध्ये सामाजिक-आर्थिक विकास प्रकल्प राबविण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.
  2. म्यानमार विस्थापितांसाठी भारताकडून जी मदत दिली जात आहे,त्याबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी आभार व्यक्त केले. दोन्ही पंतप्रधानांनी म्यानमारच्या राखीन प्रांतातल्या विस्थापितांना त्यांच्या गृहराज्यात लवकरच सुरक्षित आणि टिकावू घरकुलांची उपलब्ध करून देण्याची गरज आहे, याविषयी सहमती दर्शवली. म्यानमारच्या राखीन प्रांतातली स्थिती आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारून विस्थापितांना आपल्या गृहराज्यात परतणे शक्य व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यावर उभय पंतप्रधानांनी एकमत व्यक्त केले. 

क्षेत्रीय आणि जागतिक भागिदार

  1. संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय संघटनांमध्ये एकत्रित मिळून कार्य करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार यावेळी दोन्ही नेत्यांनी केला. विकसित देशांनी केलेल्या 2030 च्या आराखड्यानुसार आंतरराष्ट्रीय क्षेत्रात संयुक्तपणाने काम करण्याची बांधिलकीला पुष्टी देण्यात आली.
  2. दोन्ही देशांच्या दृष्टीने प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक सहकार्यासाठी प्राधान्याने सहकार्य करण्याचे उभय नेत्यांनी मान्य केले. या उद्देशपूर्तीसाठी‘बिमस्टेक’च्या कार्यामध्ये  एकजिनसीपणा आणण्यासाठी सामूहिक विकास आणि समृद्धीसाठी प्रयत्न करण्यास सहमती दर्शवली.
  3. या भेटीच्यावेळी पुढील व्दिपक्षीय सामंजस्य तसेच सहकार्याचे करार करून त्यावर स्वाक्षरी होवून करारांचे हस्तांतरण करण्यात आले.

— भारतातून मालाची  ने-आण योग्यप्रकारे करण्यासाठी चट्टोग्राम आणि मोंगला बंदराच्या वापरासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करण्याचा करार.

— भारतातल्या त्रिपूरामधल्या सबरूम शहराला पेयजल पुरवठा योजनेसाठी फेनी नदीतून 1.82 क्यूसेक्स पाणी  मागे घेण्याचा करार. 

— हैदराबाद आणि ढाका विद्यापीठांच्या दरम्यान सामंजस्य करार.

— सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचे कराराचे नूतनीकरण

— युवा व्यवहार सहकार्य सामंजस्य करार

  1. बांगलादेशाचे चेन्नईमध्ये उप-उच्चायोग सुरू करण्याचा प्रस्ताव भारताने मान्य केल्याबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

उच्च- स्तरीय भेटींमुळे शाश्वत दृढतेचे संबंध बनवण्यास वेग

  1. या भेटीच्या दरम्यान भारताने ज्या प्रेमाने आणि सौहार्दभावनेने स्वागत केले,तसेच इथल्या वास्तव्यामध्ये आपल्या शिष्टमंडळातील सदस्यांचा ज्या आदराने पाहुणचार केला, त्याबद्दल सर्वांच्यावतीने  पंतप्रधान शेख हसीना यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
  2. पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशाच्या भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले. भारताकडून हे निमंत्रण स्वीकारण्यात आले आणि उभय दुतावासांच्या मार्फत मोदी यांच्या बांगलादेश भेटीच्या तारखा निश्चित करण्याचे ठरवण्यात आले.

 

 

B.Gokhale/ Samarjit /S.Kane/S.Bedekar/D.Rane