Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बसव जयंती कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांचा सहभाग

बसव जयंती कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांचा सहभाग


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे पवित्र वचनांचे 23 भाषांतील भाषांतर समर्पित केले. तसेच बसव जयंती 2017 आणि बसव समितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.

भारताचा इतिहास हा केवळ पराभव, गरीबी किंवा वसाहतवादाचा नाही असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारताने सु-प्रशासन, अहिंसा आणि सत्याग्रहाचा संदेशही दिला असे ते म्हणाले.

गुरु बसवेश्वरांना आदरांजली वाहताना ते म्हणाले की, बसवेश्वरांनी अनेक शतकांपूर्वी लोकशाही व्यवस्थेची परिकल्पना पाहिली होती. आपल्या समाजाचे परिवर्तन घडवणाऱ्या अनेक महान व्यक्ती आपल्याला लाभल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा गरज भासली, त्यावेळी आपल्या समाजात अंतर्गत सुधारणा घडून आल्या, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की काही मुस्लीम महिलांना तीनदा तलाक पध्दतीमुळे होणाऱ्या वेदना मिटवण्यासाठी मुस्लीम समाजातूनच अंतर्गत सुधारणा घडून येतील असा मला विश्वास वाटतो. या मुस्लीम समाजाने या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

बसवेश्वरांची वचने ही सु-प्रशासनाचा पाया असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, गृहनिर्माण, वीज, रस्ते यासारख्या विकासाची फळे कुठल्याही भेदभावाशिवाय प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजेत. “सबका साथ, सबका विकास” चे हे खरे सार आहे असे ते म्हणाले.

लंडन मध्ये नोव्हेंबर 2015 रोजी भगवान बसवेश्वरांच्या अर्ध पुतळ्याचे केलेल्या अनावरणाचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.

या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या दिवंगत कन्नड एम.एम कलबुर्गी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

S.Tupe/J.Patnkar/V.Deokar