ज्येष्ठ विचारवंत आणि समाजसेवक बलराज मधोक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
“बलराज मधोकजी यांच्या आदर्श आणि विचारात स्पष्टता होती. समर्पित भावनेनं ते कार्य करीत. त्यांनी नि:स्वार्थीपणाने राष्ट्राची आणि समाजाची सेवा केली.
बलराज मधोकजी यांच्याशी अनेक विषयांवर बऱ्याचवेळा चर्चा करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख होत असून मधोक परिवाराच्या दु:खात आपणही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!” असं पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
S.Bedekar / BG
Balraj Madhok ji's ideological commitment was strong & clarity of thought immense. He was selflessly devoted to the nation & society.
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2016
Had the good fortune of interacting with Balraj Madhok ji on many occasions. His demise is saddening. Condolences to his family. RIP.
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2016
Paid tributes to late Balraj Madhok ji & met his family members. pic.twitter.com/TVsMjfbto3
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2016