Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बदरपूर-फरीदाबाद मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांकडून उद्‌घाटन

सेवानिवृत्त सैनिक देशासाठी आदरणीय आहेत. देशासाठी शहीद झालेल्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. फरीदाबाद येथे बदरपूर-फरीदाबाद मेट्रो मार्गाचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. वन रँक वन पेन्शन संदर्भात केंद्र सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी 8 हजार कोटी ते 10 हजार कोटी रुपये खर्च येणार असून यापूर्वीच्या काही अंदाजापेक्षा तो कितीतरी अधिक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे राजकारण करणे ही हल्ली फॅशन झाल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. जवान आणि नागरिकांची दिशाभूल कोणी करु नये. देशाचा विकास राजकारणातून (राजनीती) नव्हे तर राष्ट्रनीतीतून होतो, असे पंतप्रधान म्हणाले. लष्करातल्या जवानांमध्ये हरियाणातल्या जवानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वन रँक वन पेन्शनचा हरियाणाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल, असे पंतप्रधान म्हणाले.

विकास हेच सर्व समस्यांवरचे उत्तर असून देशाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे ते म्हणाले. अलिकडे संपूर्ण जगाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला मात्र भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहली. देशाच्या विकासासाठी सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांनी खांद्याला खांद्या लावून मार्गक्रमण केले पाहिजे असे सांगून सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या संकल्पनेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी यावेळी मेट्रोने प्रवास केला तसेच प्रवासादरम्यान नागरिकांशी खास करुन तरुणांशी संवाद साधला.

S.Kulkarni/S.Tupe