पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू येथे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी विमानतळ प्राधिकरणांशी संवाद साधला. यावेळी त्यांना टर्मिनल 2 च्या इमारतीच्या मॉडेलची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी अनुभूती केंद्रातील सुविधांचीही पाहणी केली आणि केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 च्या परिसरामधून पायी चालत पाहणी केली. पंतप्रधानांनी टर्मिनल 2 बद्दलचा लघुपटही पाहिला.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 क्षमतेत भर घालेल आणि सुविधांमध्ये आणखी वाढ करेल .आपल्या शहरी केंद्रांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.टर्मिनल सुंदर आणि प्रवासी स्नेही आहे ! त्याचे उद्घाटन करून आनंद झाला.”
पार्श्वभूमी
बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 सुमारे 5000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे टर्मिनल विमानतळाची प्रवासी क्षमता प्रतिवर्ष सध्याच्या सुमारे 2.5 कोटीं प्रवासी क्षमतेवरून दुप्पट करून 5-6 कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचवेल.
बंगळुरूच्या गार्डन सिटीला मानवंदना म्हणून आणि प्रवाशांना “बागेत फिरत असल्याचा ” अनुभव मिळावा यांसारखी टर्मिनल 2 ची रचना करण्यात आली आहे. प्रवासी 10,000+ चौरस मीटर हिरव्या भिंती, हँगिंग गार्डन्स आणि बाह्य भागात असलेल्या बागांमधून प्रवास करतील.विमानतळाने संपूर्ण संकुलामध्ये अक्षय्य ऊर्जेच्या 100% वापरासह शाश्वततेचा मापदंड यापूर्वीच स्थापित केला आहे. शाश्वततेच्या तत्त्वांच्या आधारावर टर्मिनल 2 ची रचना करण्यात आली आहे. शाश्वततेच्या उपक्रमांवर आधारित, टर्मिनल 2 हे कार्यान्वयन सुरू करण्यापूर्वी यूएस जीबीडी द्वारे (ग्रीन बिल्डिंग कौन्सिल) पूर्व-प्रमाणित प्लॅटिनम मूल्यांकन मिळवणारे जगातील सर्वात मोठे टर्मिनल असेल. ‘नवरसा’ च्या संकल्पनेच्या माध्यमातून टर्मिनल 2 मध्ये सर्व कलाकृती एकत्रितपणे दर्शवण्यात आल्या आहेत. या कलाकृती कर्नाटकचा वारसा आणि संस्कृती तसेच व्यापक भारतीय लोक परंपरा प्रतिबिंबित करतात.
एकंदरीत, टर्मिनल 2 ची रचना आणि वास्तू स्थापत्य , बागेमध्ये असणारे टर्मिनल, शाश्वतता , तंत्रज्ञान आणि कला आणि संस्कृती या चार मार्गदर्शक तत्त्वांनी प्रभावित आहे. टर्मिनल 2 आधुनिक असले तरी निसर्गाशी जवळीक साधणारे आणि सर्व प्रवाशांना एक संस्मरणीय ‘गंतव्य स्थळाचा ‘ अनुभव देणारे पैलू हे घटक प्रदर्शित करतात .
पंतप्रधानांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.
PM @narendramodi inaugurated Terminal 2 of the Kempegowda International Airport, Bengaluru. The state-of-the-art terminal is a visual delight and is passenger friendly. pic.twitter.com/O57S85tcNC
— PMO India (@PMOIndia) November 11, 2022
ಕೆಂಪೇಗೌಡ ಅಂತರರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ 2ನೇ ಟರ್ಮಿನಲ್, ಸಾಮರ್ಥ್ಯ ಮತ್ತು ಅನುಕೂಲತೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಇದು ನಗರ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಉನ್ನತ ದರ್ಜೆಯ ಮೂಲಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸುವ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನಗಳ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿದೆ. ಟರ್ಮಿನಲ್ ಸುಂದರ ಮತ್ತು ಪ್ರಯಾಣಿಕರ ಸ್ನೇಹಿಯಾಗಿದೆ! pic.twitter.com/F315D5wjJV
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2022
Terminal 2 of the Kempegowda International Airport, Bengaluru will add capacity and further convenience. It is a part of our efforts aimed at providing top class infrastructure to our urban centres. The Terminal is beautiful and passenger friendly! Glad to have inaugurated it. pic.twitter.com/t5ohAr6WCm
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2022