Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बंगळुरू येथील केएसआर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

बंगळुरू येथील केएसआर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

बंगळुरू येथील केएसआर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना


नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू येथील केएसआर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

क्रांतिवीर सांगोल्ली  रायण्णा (केएसआर) रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक  7 वर रेल्वेगाडी जिथून सुटते त्या  भागात पंतप्रधानांचे आगमन झाले आणि त्यांनी चेन्नई-म्हैसुर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी आहे  आणि दक्षिण भारतातील अशाप्रकारची ही  पहिलीच रेल्वेगाडी आहे. ही गाडी  चेन्नईचे औद्योगिक केंद्र, बंगळुरूचे तंत्रज्ञान  आणि स्टार्टअप केंद्र  आणि प्रसिद्ध पर्यटन शहर म्हैसूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवेल.

यासंदर्भात  एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“चेन्नई-म्हैसुरू वंदे भारत एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी तसेच व्यावसायिक उपक्रमांना  चालना देईल.यामुळे ‘जीवन सुलभता ’ देखील वाढेल. बंगळुरूहून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवताना  अत्यंत आनंद झाला.”

यानंतर पंतप्रधानांनी फलाट क्रमांक 8 वरील रेल्वेगाडी जिथून सुटते त्या भागात जाऊन भारत गौरव काशी यात्रा रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. भारत गौरव योजनेअंतर्गत ही रेल्वेगाडी सुरु करणारे  कर्नाटक हे पहिले राज्य आहे. या अंतर्गत कर्नाटकातील यात्रेकरूंना काशीला पाठवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि रेल्वे मंत्रालय एकत्रितरित्या  काम करत आहेत.काशी, अयोध्या आणि प्रयागराजला जाण्यासाठी यात्रेकरूंना सुखकर  मुक्काम आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“भारत गौरव काशी यात्रा रेल्वेगाडी सुरु करणारे पहिले राज्य म्हणून मला  कर्नाटकची प्रशंसा करायची आहे. ही रेल्वेगाडी काशी आणि कर्नाटकला जवळ आणते.या माध्यमातून  यात्रेकरू आणि पर्यटक काशी, अयोध्या आणि प्रयागराजला सहज भेट देऊ शकतील.”

यावेळी पंतप्रधानांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री   बसवराज बोम्मई, कर्नाटकचे राज्यपाल  थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि  प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

वंदे भारत एक्प्रेस

वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट आणि विमानासारख्या  प्रवासाचा  अनुभव देते. ही रेल्वेगाडी  प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यात  रेल्वे गाड्यांची धडक टाळण्यासाठीची  स्वदेशी विकसित ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम – कवच  समाविष्ट आहे. वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने  सुसज्ज आहे आणि ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकतो  आणि या रेल्वेगाडीचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर  पर्यंत पोहोचतो, ही या रेल्वेगाडीची सुधारित वैशिष्ट्ये आहेत. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 392 टन आहे , जे आधी  430 टन होते.यात वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधाही उपलब्ध आहे  .या रेल्वेगाडीच्या मागील आवृत्‍तीत असलेल्या  24 इंच रुंदीच्या   स्‍क्रीनच्‍या तुलनेत प्रत्‍येक डब्यामध्ये  32 इंच रुंदीचे स्‍क्रीन आहेत ज्याद्वारे  प्रवाशांना  माहिती आणि मनोरंजन उपलब्ध होते . या गाडीतील वातानुकूलन 15 टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस पर्यावरणस्नेही देखील  ठरत आहे ट्रॅक्शन मोटरच्या माध्यमातून धूळ-मुक्त स्वच्छ हवा वातानुकूलनासह, या रेल्वेगाडीतील  प्रवास अधिक आरामदायी  होणार आहे. .आरामदायी आसनांची म्हणजेच साइड रिक्लायनर सीटची सुविधा जी पूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील प्रवाशांना दिली जात होती ती आता सर्व श्रेणीसाठी उपलब्ध करून दिली जाईल.एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये  180-अंशात  फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी असलेल्या रूफ-माउंटेड पॅकेज युनिटमध्ये  (आरएमपीयु )   फोटो-कॅटॅलीस्ट अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. चंदीगढच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार,  ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारे जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादींपासून मुक्त हवा गाळून स्वच्छ करण्यासाठी डिझाईन केलेली  प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर स्थापित करण्यात आली आहे.

भारत गौरव रेल्वेगाडी

भारतीय रेल्वेने नोव्हेंबर 2021 मध्ये संकल्पना-आधारित भारत गौरव रेल्वेगाडीचे परिचालन सुरू केले. भारत गौरव रेल्वेगाडीच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगभरातील लोकांना दाखवणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. भारताच्या अफाट पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी संकल्पना-आधारित रेल्वेगाडी चालवण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या प्रमुख सामर्थ्यांचा फायदा घेणे हा देखील या योजनेमागचा उद्देश आहे. 

 

 

 

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai