Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन


नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025 

 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येणार आहेत. या शिखर परिषदेत आम्ही सर्वजण मिळून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा नवोन्मेषास तसेच व्यापक सार्वजनिक हितासाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह  पद्धतीने  वापर करण्यासंबंधीच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण करणार आहोत.

माझ्या या दौऱ्यातील द्विपक्षीय भेटींच्या नियोजनाअंतर्गत, माझे मित्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीसाठी 2047 होरायझन रोडमॅपसंबंधीच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधीही मिळणार आहे. या भेटीत आम्ही  फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी मार्सेल या फ्रान्सच्या ऐतिहासिक शहरालाही भेट देणार आहोत, यासोबतच आम्ही आंतरराष्ट्रीय उष्णसंजलन प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पालाही (International Thermonuclear Experimental Reactor project) थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर प्रकल्पाला ही भेट देणार आहोत. भारत हा या प्रकल्पाच्या भागीदार देशांच्या संघाचा सदस्य आहे. याशिवाय मी माझरी युद्ध स्मशानभूमीला भेट देऊन पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहे.

फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मी माझे मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी मिळवलेल्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आणि त्यांच्या शपथविधीनंतर ही आमची पहिलीच भेट असेल, मात्र भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्यासाठी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आम्ही एकत्र काम केल्याच्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत.ही भेट त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्याच्या यशाच्या पायावर नवी उभारणी करण्याची तसेच तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि पुरवठा साखळीतील लवचिकता या क्षेत्रांसह दोन्ही देशांमधील  परस्पर भागीदारीला नवी उंची मिळवून देण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यक्रम आखण्याची संधी असणार आहे. आम्ही दोन्ही देशांमधील जनतेच्या परस्पर हितासाठी एकत्र काम करू आणि जगासाठी चांगले भविष्य घडवू.

 

* * *

JPS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai