Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली


फ्रान्सचे संरक्षण मंत्री जॉ युवे ल द्रा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमधल्या उरीमध्ये 18 सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांप्रती त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या. दहशतवादाविरोधात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दहशतवादाविरोधातल्या लढाईत फ्रान्स भारताच्या खांद्याला खांदा भिडवून उभा असल्याचेही ते म्हणाले.

फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याविषयीच्या सध्याच्या स्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली.

36 राफेल विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले. या कराराच्या कालबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीचे आवाहनही त्यांनी केले.

S. Tupe/ N. Chitale /D. Rane