फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजकीय सल्लागार फिलीप एटीयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी संरक्षण आणि सुरक्षेसह सर्व क्षेत्रात फ्रान्सकडून सहकार्य करण्यात येईल, असं एटीयन यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जून 2017 मध्ये फ्रान्सला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. भारत आणि फ्रान्स यांच्या मैत्री आणि भागीदारीमध्ये संरक्षण आणि सुरक्षा ही दोन्ही क्षेत्रं म्हणजे महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. सर्वच क्षेत्रात उभय देशात सामंजस्य आणि सहकार्याचं नात वृध्दींगत होत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅकराँ यांनी लवकरच भारत दौरा करावा, आपण त्यांच्या भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor