पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लॉरेंट फेबियस यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी यावेळी पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच या हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या निर्दोष व्यक्तींना श्रध्दांजली अर्पित केली.
पंतप्रधानांनी यावेळी फ्रान्स सोबतच्या धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चार केला. यावर्षीच्या सुरुवातीला केलेल्या आपल्या फ्रान्सच्या दौऱ्याचा उल्लेख करतांना त्यांनी सांगितले की, या दौऱ्याने दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांना नवीन ऊर्जा आणि चेतना प्रदान केली आहे.
आगामी सीओपी-21 शिखर परिषदेच्या सकारात्मक परिणामांची अपेक्षा व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, हे परिणाम न्यायसंगत, संतुलित आणि यूएनएफसीसीच्या तरतूदी आणि तत्त्वाच्या दिशानिर्देशांनूसार व विशेषत: सर्वसामान्य तत्व पंरतु जबाबदारी आणि संबंधित क्षमतांशी निगडीत असावेत. या परिणामांमुळे विकसनशील आणि छोटया द्विपसमूह विकसनशील देशांना अधिक तांत्रिक, आर्थिक आणि क्षमता वृध्दिंगत करण्यासाठी सहाय्य मिळाले पाहिजे, जेणेकरुन हे देश देखील महत्त्वाकांक्षी हवामान बदल कार्यक्रमात अधिक कार्यक्षम होतील. मोदी म्हणाले की सीओपी शिखर परिषदे दरम्यान फ्रान्सचे राष्ट्रपती आणि इतर नेत्यांसोबत आंतरराष्ट्रीय सौर कराराची सुरुवात करायला देखील आपण उत्सुक आहेत.
भारताने जाहिर केलेल्या आयएनडीसीची प्रशंसा करतांना फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणाले की सीओपी-21 शिखर परिषदेच्या यशामध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Met the Foreign Minister of France, Mr. @LaurentFabius. https://t.co/Bb1sAJePOq pic.twitter.com/DD8JS1ujGg
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2015