1 |
अमली पदार्थ, मादक द्रव्य आणि रासायनिक संयुगे यांचा अवैध वापर आणि अवैध वाहतूक कमी करण्यासाठी तसेच संबंधित गुन्हे रोखण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान करार. |
राजनाथ सिंग, गृहमंत्री |
जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री |
अमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि वापर रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य या कराराद्वारे अपेक्षित असून, दहशतवादाच्या वित्त पुरवठ्यावरही याचा परिणाम होईल. |
2 |
भारत-फ्रान्स स्थलांतरण आणि गतीशीलता भागिदारी करार |
सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री |
या करारामुळे गतीशीलतेवर आधारीत तात्पुरते स्थलांतरण आणि मुळ देशाकडे कौशल्य परत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. |
3 |
शैक्षणिक पात्रतेला सामाईक मान्यता देण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार |
प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकास मंत्री |
फ्रेडरीक विदाल, उच्च शिक्षण, संशोधन आणि नव संशोधन मंत्री |
शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देणे हा या कराराचा हेतु आहे. |
4 |
रेल्वे मंत्रालय आणि फ्रान्सच्या एस.एन.सी.एफ मोटिव्हीटीज् यांच्यात रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार |
पियुष गोयल, रेल्वे मंत्री |
जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री |
परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे आणि अतिजलद रेल्वे मार्गावर विशेष लक्ष केंद्रीत करणे, स्थानकाचे नुतनीकरण, पायाभूत सुविधांचे आणि उपनगरीय गाड्यांचे आधुनिकीकरण करणे हा या कराराचा हेतु आहे. |
5 |
कायम स्वरुपी भारत-फ्रान्स रेल्वे फोरम निर्माण करण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान स्वारस्य पत्रे |
पियुष गोयल, रेल्वे मंत्री |
जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री |
भारत-फ्रान्स कायम स्वरुपी रेल्वे फोरम निर्माण करुन सध्याचे सहकार्य वृद्धिंगत करणे हा या स्वारस्य पत्राचा उद्देश आहे. |
6 |
भारत आणि फ्रान्सच्या सशस्त्र दलांदरम्यान परस्पर लॉजिस्टिक सहकार्याच्या तरतुदींसंदर्भात करार |
निर्मला सितारामन, संरक्षण मंत्री |
फ्लॉरेन्स पार्ली, सशस्त्र दल मंत्री |
उभय देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान अधिकृत बंदर दौरे, संयुक्त सराव, संयुक्त प्रशिक्षण, मानवी सहकार्य आणि आपत्ती बचाव कार्यादरम्यान परस्पर लॉजिस्टिक सहकार्य पुरवठा आणि सेवांची तरतूद या करारात आहे. |
7 |
पर्यावरण क्षेत्रात भारत आणि फ्रान्स दरम्यान सामंजस्य करार |
डॉ.महेश शर्मा, पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री |
ब्रुन पोइरसन, पर्यावरण आणि सर्वसमावेशक परिवर्तन राज्यमंत्री |
पर्यावरण आणि हवामान बदल क्षेत्रात उभय देशांच्या सरकार आणि तांत्रिक तज्ञां दरम्यान माहितीच्या आदान-प्रदानासाठी पाया तयार करणे हा या कराराचा उद्देश आहे. |
8 |
शाश्वत शहरी विकास क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि फ्रान्स दरम्यान करार |
हरदीप सिंग पुरी, गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) |
ब्रुन पोइरसन, पर्यावरण आणि सर्वसमावेशक परिवर्तन राज्यमंत्री |
स्मार्ट शहर विकास, शहरी वाहतूक प्रणालीचा विकास, शहरी गृहनिर्माण आणि सुविधा याबाबतीत माहितीचे आदान-प्रदान या करारामुळे शक्य होईल. |
9 |
वर्गीकृत किंवा संरक्षित माहितीच्या आदान-प्रदान आणि परस्पर संरक्षणाबाबत भारत आणि फ्रान्सदरम्यान करार |
अजित डोवल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार |
फिलीप इटीएनी, फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार |
वर्गीकृत आणि संरक्षित माहितीच्या कोणत्याही आदान-प्रदानाला लागू असणारे समान सुरक्षा नियम या करारात नमूद करण्यात आले आहेत. |
10 |
मेरीटाईम अवेयरनेस मिशनच्या अभ्यासासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि सीएनईएस दरम्यान व्यवस्था |
के.सिवान, सचिव, अंतराळ विभाग आणि इस्रोचे अध्यक्ष |
जिन-वेस ली गॉल, अध्यक्ष सीएनईएस |
फ्रान्स आणि भारताच्या स्वारस्य क्षेत्रातील जहाजांचा शोध, ओळख आणि देखरेखीबाबत तोडगा काढण्यासाठी हा करार. |
11 |
भारतीय अणु ऊर्जा महामंडळ आणि ईडीएफ, फ्रान्स दरम्यान औद्योगिक करार |
शेखर बासू, सचिव, अणु ऊर्जा विभाग |
जिन-बर्नार्ड लेव्ही, सीईओ, ईडीएफ |
जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग आखण्याची तरतूद या करारात आहे. |
12 |
हायड्रोग्राफी आणि मेरीटाईम कार्टोग्राफी बाबत सहकार्यावर भारत आणि फ्रान्स दरम्यान द्विपक्षीय करार |
विनय क्वाट्रा, भारताचे राजदूत |
अलेक्झांडर झिग्लर, फ्रान्सचे राजदूत |
हायड्रोग्राफी नॉटीकल डॉक्युमेंटेशन आणि मेरीटाईम सुरक्षा माहिती क्षेत्रात उभय देशांदरम्यान सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार. |
13 |
स्मार्ट शहरांना अर्थसहाय्य करण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान 100 दशलक्ष युरोच्या कर्ज सुविधेबाबत करार |
विनय क्वाट्रा, भारताचे राजदूत |
अलेक्झांडर झिग्लर, फ्रान्सचे राजदूत |
स्मार्ट शहर अभियानांतर्गत दिला जाणारा निधी आणि केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिला जाणारा निधी यातील तफावत भरुन काढण्यासाठी या कराराची मदत होईल. |
14 |
राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (एनआयएसई) आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (आयएनईस) फ्रान्स दरम्यान सामंजस्य करार |
विनय क्वाट्रा, भारताचे राजदूत |
डॅनियल वर्वार्डे, प्रशासक, अणु आणि पर्यायी ऊर्जा आयोग (सीईए) |
तंत्रज्ञान हस्तांतरण आणि एकत्रित उपक्रमांच्या माध्यमातून सौर ऊर्जा क्षेत्रात आयएसए सदस्य देशांमधील प्रकल्पांवर उभय देश या करारामुळे काम करु शकतील. |
अनु.क्र. | सामंजस्य करार/करार | भारताकडून | फ्रान्सकडून | हेतु |
---|
B.Gokhale/S.Kane/D.Rane