Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फेसबुकच्या माध्यमातून टाऊनहॉल येथे होणाऱ्या प्रश्नोत्तराच्या सत्रासाठी प्रश्न पाठवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


फेसबुकचे मुख्यालय असलेल्या टाऊनहॉल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर 2015 रोजी उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणाऱ्या प्रश्नोत्तराच्या सत्रासाठी नागरिकांनी प्रश्न पाठवावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

“फेसबुकचे प्रमुख मार्क जुकेरबर्ग यांनी मला फेसबुक मुख्यालयात येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यावेळी सकाळी 10 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) होणाऱ्या प्रश्नोत्तराच्या सत्राविषयी मी उत्सुक आहे, यावेळी विविध विषयांवर संवाद आणि चर्चा होऊ शकेल, हा संवाद नक्कीच संस्मरणीय ठरेल, असा मला विश्वास आहे. मात्र, तुम्हा सर्वांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण ठरेल. त्यामुळे तुम्ही आपले प्रश्न नरेंद्र मोदी मोबाईल ॲप” च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचवावेत असे मी आवाहन करतो” असे पंतप्रधानांनी आपल्या फेसबुक संदेशात म्हटले आहे.

R. Aghor/S.Tupe