Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्ती सुची : भारत- व्हिएतनाम आभासी शिखर परिषद (डिसेंबर 21, 2020)


 

1

शांतता,समृद्धी आणि जनतेसाठी भारत- व्हिएतनाम संयुक्त दृष्टीकोन

उद्देश :दीर्घकालीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध, सामायिक मुल्ये आणि हित, परस्पर धोरणात्मक विश्वास आणि उभय देशातले सामंजस्य यांच्या पायावर भारत- व्हिएतनाम सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता  

भारताच्यावतीने पंतप्रधानांकडून स्वीकार

 

2

सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पुढील अंमलबजावणीसाठी 2021-2023 या काळासाठी कृती आराखडा

उद्देश : शांतता,समृद्धी आणि जनता यांच्यासाठी संयुक्त दृष्टीकोनाच्या अंमलबजावणीसाठी 2021-2023 या काळात उभय बाजूंनी प्रस्तावीत ठोस प्रस्तावित कृती

डॉ. एस जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री

फाम बिन्ह मिन्ह, उप पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

3

भारताच्या संरक्षण मंत्रालया अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग, आणि व्हिएतनामच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालया अंतर्गत संरक्षण उद्योगाचा जनरल विभाग यांच्यात संरक्षण उद्योग सहकार्याची अंमलबजावणी व्यवस्था

उद्देश :दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगात सहकार्याला प्रोत्साहन देण्याकरिता आराखडा पुरवण्यासाठी

सुरेंद्र प्रसाद यादव, सह सचिव (नौदल प्रणाली )

 

मेजर जनरल लुओंग थान्ह चुओंग, उपाध्यक्ष

 

4

व्हिएतनामच्या न्हा त्रांगमध्ये राष्ट्रीय टेलीकम्युनिकेशन विद्यापीठात आर्मी सॉफ्टवेअर पार्कसाठी भारताकडून 5 दशलक्ष डॉलर्सच्या सहाय्यासाठी, भारतीय दूतावास, हनोई, आणि टेलीकम्युनिकेशन विद्यापीठ, व्हिएतनाम राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात करार

उद्देश : न्हा त्रांगमध्ये टेलीकम्युनिकेशन विद्यापीठात आर्मी सॉफ्टवेअर पार्कसाठी माहिती तंत्रज्ञान सुविधा उभारण्यासाठी, सॉफ्टवेअर एप्लिकेशन क्षेत्रात प्रशिक्षण आणि सेवा पुरवण्याच्या तरतुदीसह

प्रणय वर्मा, भारताचे व्हिएतनाममधले राजदूत

 

 

 

कर्नल ली हंग, रेक्टर

 

5

संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत सहकार्याकरिता संयुक्त राष्ट्र शांती सेना संचालन, भारत आणि व्हिएतनाम शांती सेना संचालन यांच्यात अंमलबजावणी व्यवस्था

उद्देश : संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत सहकार्य विकासासाठी विशिष्ट उपक्रम निश्चित करण्यासाठी

मेजर जनरल अनिल काशीद,अतिरिक्त महासंचालक (आयसी )

 

मेजर जनरल होएंग किम फुंग, संचालक

 

6

भारताचे अणुऊर्जा नियामक मंडळ (AERB)आणि व्हिएतनामच्या किरणोत्सर्ग आणि अणुसुरक्षा यंत्रणा (VARANS) यांच्यात सामंजस्य करार

उद्देश- किरणोत्सर्ग संरक्षण आणि अणुसुरक्षा या क्षेत्रांत, दोन्ही देशांच्या नियामक मंडळादरम्यान परस्पर सहकार्य वाढण्यास प्रोत्साहन

श्री जी नागेश्वर राव, अध्यक्ष, (AERB)

गुयेन युआन खाई, हासंचालक

7

CSIR- भारतीय पेट्रोलियम आणि व्हिएतनाम पेट्रोलियम संस्था यांच्यात सामंजस्य करार

उद्देश – पेट्रोलियम संशोधन आणि प्रशिक्षण यांच्यात सहकार्याला प्रोत्साहन देणे

डॉ अंजान रे, संचालक

गुयेन आह डूओ

8

टाटा मेमोरियल सेंटर ऑफ इंडिया आणि व्हिएतनाम नैशनल कॅन्सर हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार..

उद्देश : वैज्ञानिक संशोधन, आरोग्य सुविधा सेवा यांच्यात समन्वय आणि सहकार्याला प्रोत्साहन, कर्करोगाच्या रुग्णांसाठी निदान आणि उपचार याबाबत सहकार्य

डॉ राजेंद्र अ बडवे, संचालक,

श्री ली वैन क़्वान्ग, संचालक

9

भारतीय राष्ट्रीय सौर महासंघ आणि व्हिएतनाम स्वच्छ ऊर्जा संघटना यांच्यात सामंजस्य करार..

उद्देश : ज्ञान, उत्तम पद्धती यांच्यातील देवघेवीला प्रोत्साहन, भारत आणि व्हिएतमान मधील सौर उर्जा उद्योगांमध्ये सहकार्य वाढवणे, आणि दोन्ही देशात सौर उर्जेच्या व्यावसायिक संधींचा शोध घेणे

श्री प्रणव आर मेहता, अध्यक्ष

श्री दावो दु द्युओंग , अध्यक्ष

अ.क्र. दस्तावेज भारताकडून व्हिएतनामकडून

 

यावेळी खालील घोषणा करण्यात आल्या :

1.  भारत सरकारने व्हिएतनामला दिलेल्या 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाअंतर्गत, व्हिएतनामच्या बॉर्डर गार्ड कमांडसाठी हाय स्पीड गार्ड बोर्ड निर्मिती प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची घोषणा; व्हिएतनाममध्ये तयार होणाऱ्या सात एचएसजीबी चा पाया घालण्याची घोषणा

2. व्हिएतनामच्या निन्ह थुआन प्रदेशातील स्थानिक समुदायासाठी भारताने 1.5 दशलक्ष डॉलर्सची मदत देऊ केली आहे. हे विकास प्रकल्प पूर्ण करुन ते व्हिएतनामला सोपवणे.

3. वार्षिक जलद गती प्रकल्पांची संख्या वाढवणे. सध्या ही संख्या पाच असून आर्थिक वर्ष  2021-2022 पर्यंत ही संख्या दहापर्यंत वाढवणे.

4. व्हिएतनामच्या वारसा स्थळ संवर्धनासाठीचे तीन विकास प्रकल्प भागीदारीत पूर्ण केले जाणार असून त्यांच्या कामांची घोषणा आज करण्यात आली. यात-  माय सन येथील मंदिराचा एफ ब्लॉक, क्वांग नाम प्रदेशातील डॉंग डूयोंग बौद्ध प्रार्थनास्थळ/मठ आणि फू येन प्रदेशांतील हंचाम टॉवर या स्थळांचा समावेश 

5. भारत-व्हिएतनाम नागरी आणि सांस्कृतिक संबंधांविषयीचा विश्वकोश तयार करण्याच्या द्विपक्षीय प्रकल्पाची घोषणा.

****

U.Ujgare/N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com