Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्तींची यादी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुवेतला भेट (डिसेंबर 21-22, 2024)

फलनिष्पत्तींची यादी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुवेतला भेट (डिसेंबर 21-22, 2024)


.क्र.

सामंजस्य करार/करार

उद्दिष्ट

1

भारत आणि कुवेत यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

हा सामंजस्य करार संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला संस्थात्मक रूप प्रदान करेल.  सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, कर्मचारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त सराव, संरक्षण उद्योगात सहकार्य, संरक्षण उपकरणांचा पुरवठा तसेच संशोधन आणि विकासामध्ये सहकार्य यांचा समावेश आहे.

2.

2025-2029 या कालावधीसाठी भारत आणि कुवेत दरम्यान सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम (CEP).

सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम कला, संगीत, नृत्य, साहित्य आणि नाट्य, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सहकार्य, संस्कृतीच्या क्षेत्रात संशोधन तसेच विकास आणि उत्सवांचे आयोजन यामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण करणे सुलभ करेल.

3.

क्रीडा क्षेत्रातील सहकार्यासाठी कार्यकारी कार्यक्रम (EP) (2025-2028)

हा कार्यकारी कार्यक्रम भारत आणि कुवेत यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याला बळकटी देईल. यामुळे अनुभवाची देवाणघेवाण, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम आणि प्रकल्पांमध्ये सहभाग, क्रीडा वैद्यकीय, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा मीडिया, क्रीडा विज्ञान आणि इतर क्षेत्रातील तज्ञांची देवाणघेवाण यासाठी क्रीडा क्षेत्रातील प्रमुखांच्या भेटी वाढतील.

4.

कुवेतचे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) चे सदस्यत्व.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सामूहिकरित्या सौर ऊर्जेच्या उपयोजनाचा अंतर्भाव करते आणि सदस्य देशांना कमी-कार्बन वाढीचा मार्ग विकसित करण्यात मदत करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या प्रमुख सामान्य आव्हानांना संबोधित करते.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com