पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळाने प्रशासन, अंमलबजावणी आणि देखरेख यंत्रणा मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास निधी (एनएसडीएफ) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्या पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे.
या पुनर्रचनेमुळे एनएसडीसीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्पोरेट प्रशासन क्षमता येईल तसेच एनएसडीएफची देखरेख भूमिका अधिक सशक्त होईल. या मंजुरीमुळे एनएसडीएफ मंडळाच्या संरचनात्मक पुनर्रचनेसह एनएसडीसीच्या शासन, अंमलबजावणी आणि देखरेख प्रणालीला बळ मिळेल.
पार्श्वभूमी :
कौशल्य विकास क्षेत्रात उत्तम समन्वय राखण्यासाठी अर्थ मंत्रालयाने एनएसडीसी आणि एनएसडीएफची स्थापना आणि नोंदणी जुलै २००८ आणि जानेवारी २००९ मध्ये केले होते. याचा उद्देश विविध क्षेत्रातील विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे.
N.Sapre/S.Kane/P.Malandkar