Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रयागराज येथे पंतप्रधानांच्या हस्ते नव्या विमानतळ संकुलाचे, कुंभमेळ्यासाठीच्या एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्षाचे व विविध विकासप्रकल्पांचे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे नव्या विमानतळाच्या संकुलाचे, कुंभमेळ्यासाठीच्या एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्षाचे व विविध विकासप्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

त्यानंतर पंतप्रधानांनी गंगापूजन केले तसेच स्वच्छ कुंभ प्रदर्शनाचे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते झाले. प्रयागराज इथल्या ‘अक्षयवट’ लाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर प्रयागराज इथल्या अंदावा येथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण, उद्‌घाटन आणि पायाभरणी समारंभ झाला.

यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, यंदा अर्धकुंभमेळ्यासाठी येणारे भाविक अक्षयवटाचेही दर्शन घेऊ शकतील. प्रयागराजला येण्यासाठी दळण-वळण व्यवस्था अधिक उत्तम करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले. आज लोकार्पण केलेल्या प्रकल्पांमुळे प्रयागराजच्या पायाभूत सुविधा आणि दळण-वळणात सुधारणा होईल असे ते म्हणाले. नव्या विमानतळ टर्मिनलचे काम एका वर्षाच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

अर्धकुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले. भारताचा वैभवशाली इतिहास आणि उज्ज्वल भवितव्याचे दर्शन या कुंभमेळ्यातून घडावे यासाठी यंत्रणा काम करत असल्याचे ते म्हणाले.

गंगा नदी स्वच्छ करण्यासाठीचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत असे सांगत सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि घाटांचे सौंदर्यीकरण यामुळे गंगा नदी स्वच्छता मोहिमेला गती मिळाली असल्याचे ते म्हणाले.

कुंभ हे भारत आणि भारतीयत्वाचे प्रतिक आहे असे पंतप्रधान म्हणाले. कुंभमेळ्यामुळे आपण एक होतो. कुंभमेळा हा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ याचेच दर्शन देतो असे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याचे आयोजन केवळ श्रद्धेचाच विषय नाही तर हा भारताच्या सन्मानाचाही विषय आहे. त्यामुळे कुंभमेळ्याला येणाऱ्या प्रत्येक भाविकाची योग्य काळजी घ्यावी जावी असे त्यांनी सांगितले. या अर्धकुंभमेळ्यातून नव्या भारतात परंपरा आणि आधुनिकता याचा संगम झाल्याचे दर्शन भाविकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही शक्ती न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, याबाबत देशाच्या नागरिकांनी सजग राहावे असे पंतप्रधान म्हणाले. असे लोक स्वत:ला सर्व सस्थांपेक्षा मोठे समजतात, अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar