Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांना पंतप्रधानांनी दिला निरोप


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांना काल 7 लोककल्याण मार्ग इथे आयोजित एका कार्यक्रमात निरोप दिला. अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मिश्रा यांचा उल्लेख मौल्यवान रत्न असा करत पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षात त्यांच्याबरोबर व्यतित केलेल्या क्षणांची आठवण सांगितली. मेहनती स्वभाव, कामाप्रती समर्पित वृत्ती आणि एक नागरी सेवक म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. मिश्रा यांनी आपल्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग केल्याचे अनेक दाखले यावेळी पंतप्रधानांनी विशद केले.

मिश्रा हे सक्षम आणि अनुभवी अधिकारी आहेत जे संघर्ष निराकरणात पारंगत होते. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी भारत सरकारसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पंतप्रधानांनी प्रधान सचिवांचे आभार मानले.

नवीन भारत निर्मितीच्या स्वप्नाच्या दिशेने काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रधान सचिवांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या लक्ष्याभिमुख, तंत्रज्ञानाची जाण आणि मानवी दृष्टिकोनाची त्यांनी प्रशंसा केली. आणि संपूर्ण सरकारी व्यवस्थेला नवीन भारत घडविण्याच्या उद्देशाने कार्य करण्याचे आवाहन केले.

****

B.Gokhale/ S. Kane