नवी दिल्ली,10 जून 2024
पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार 2015-16 पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. पीएमएवाय अंतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबांकरिता 4.21 कोटी घरे बांधून झाली आहेत.
पीएमएवाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय, एलपीजी कनेक्शन, वीज जोडणी, चालू स्थितीतील नळ जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवण्यात आल्या आहेत.
3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पात्र कुटुंबांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai