Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रत्येकाने योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना योग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की योग आपल्याला शांतता प्रदान करतो, ज्यामुळे आपल्याला जीवनातील आव्हानांचा शांतपणे आणि धैर्याने सामना करण्यास मदत होते.
आगामी योग दिनाच्या निमित्ताने, मोदी यांनी विविध योगासनांवर मार्गदर्शन करणारे आणि योगासनांच्या फायद्यांविषयी माहिती देणाऱ्या व्हिडिओंची एक मालिका सामायिक केली.

एक्स पोस्टच्या मालिकेत, पंतप्रधानी सांगितलं;
“आजपासून दहा दिवसांनी, जग दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करेल. एकता आणि सामंजस्य साजरे करणारी ही एक कालातीत प्रथा आहे. योगाने सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन, समग्र कल्याणाच्या शोधात जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणले आहे.”

“यावर्षीच्या योग दिनाच्या दृष्टीने, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याची आणि इतरांनाही त्याचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा सांगणे आवश्यक आहे. योग शांतता प्रदान करतो, ज्यामुळे आपल्याला जीवनातील आव्हानांचा शांतपणे आणि धैर्याने सामना करण्यास मदत होते.”

“योग दिन जवळ येत असताना, मी विविध योगासनांवर मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या फायद्यांविषयी माहिती देणारे व्हिडिओ सामायिक करत आहे. मला आशा आहे की हे सर्वांना नियमित योगाभ्यास करण्यास प्रेरणादायी ठरेल.”

***

SonalT/GajendraD/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai