Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे एनसीसी छात्र आणि एनएसएस स्वयंसेवक यांच्याशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे एनसीसी छात्र आणि एनएसएस स्वयंसेवक यांच्याशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद


नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2025

 

सहभागी : सर, आज तुम्हाला पाहून माझे स्वप्न पूर्ण झाले.

पंतप्रधान: खूप छान, हो, तर तुम्ही आता  झोपत होतात.

सहभागी : नाही, तुम्हाला  पाहून असे वाटते की आम्ही सर्वात मोठ्या नायकाला भेटलो आहोत.

सहभागी : येथे येऊ आणि सर्व सुरक्षा दलांना पाहू हे  माझे मोठे स्वप्न होते, मी खास तुम्हाला पहायला आले आहे.

पंतप्रधान : बरं, बरं

सहभागी : त्यामुळे आता विश्वास बसत नाही की मी तुमच्याशी बोलत आहे आणि तेही समोरासमोर.

पंतप्रधान : ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे.

सहभागी : खूप खूप धन्यवाद सर.

पंतप्रधान : अन्य दुसऱ्या राज्यातील मित्रमैत्रिणींशी ओळख करून घेऊन ते राज्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथल्या भाषेत एक-दोन वाक्ये बोलता आली असे कोण  कोण आहेत?

सहभागी: सर, पश्चिम बंगालमधील इथे काहीजण बसले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि जसे की आम्ही भात खात होतो, तर भाताबद्दल एक वाक्य होते, तो म्हणाला एकतो एकतो भात खावे.

पंतप्रधान  : एकतो एकतो भात खावे। खावे बोलला, खाबे बोलला?

सहभागी : खाबो.

पंतप्रधान  : खाबो.

सहभागी : सर जोल खाबो, एक आणखी काय होते ? तो अमी केमो नाचो अमी भालो आची (दूसरी भाषा)

सहभागी  : मी मुंगेरच्या नगरीतून. मुंगेरच्या समस्त जनतेच्या वतीने तुम्हाला नमस्कार, सर.

पंतप्रधान : माझ्याकडून  मुंगेरच्या भूमीला नमस्कार. मुंगेरची भूमी तर योगसाठी जगभर ओळखली जाते.

सहभागी  : हो  सर, हो सर.

पंतप्रधान : तर  तुम्ही इथे  सर्वांचे योगगुरू बनला  आहात.

सहभागी : म्हणजे सर, सगळ्यांचा तर नाही बनू शकलो, पण आमच्या गटात जे काहीजण होते त्या काही लोकांच्या टीमचा गुरु  बनू शकलो.

पंतप्रधान: आता तर संपूर्ण जग योगशी जोडले जात आहे.

सहभागी : हो  सर.

पंतप्रधान : हं.

सहभागी  :आणि काल तिथे  राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात आम्ही तुमच्यासाठी दोन ओळी लिहिल्या आहेत, विजय असो, भारत मातेचा विजय असो, भारतवासियांचा विजय असो, उंच फडकणाऱ्या नवध्वजाचा विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, दहशतवादाचे भय नसो, शत्रूंचे भय नसो, प्रत्येकाच्या मनात  प्रेम आणि विनय असो, विजय असो, विजय असो, विजय असो.

पंतप्रधान : विजय असो.

सहभागी : विजय असो, खूप खूप धन्यवाद.

सहभागी : स्वच्छ भारत अभियान आणि स्वस्थ भारत अभियान यांसारखे जे उपक्रम तुम्ही सुरु केले आहेत त्यामुळे देशाची प्रगती तर झाली आहेच , त्याचबरोबर  सर्व युवक ज्याप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतात आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे प्रत्येकजण तुमच्याकडे ओढला जातो, तुम्हाला भेटायचे असते , ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे की आमचे पंतप्रधान तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आहे.

पंतप्रधान : स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी जर आपल्याला कोणतेही एक तत्व अंमलात आणायचे असेल तर ते कोणते आहे ?

सहभागी: आपण इतरांनाही प्रेरणा देणे, जसे मी नवरात्रीच्या वेळी मंदिरात गेले होते.

पंतप्रधान : बघा, अगदी बरोबर सांगितले. स्वच्छ भारत बनवण्यासाठी जर 140 कोटी जनतेने ठरवले की आपण कचरा करणार नाही, तर मग कचरा कोण करेल, आपोआप  स्वच्छ होईल.

सहभागी : जय हिंद सर, मी सुष्मिता रोहिदास , ओडिशामधून आले आहे. 

पंतप्रधान  : जग जगन्नाथ .

सहभागी : जग जगन्नाथ , सर. तुम्ही माझी प्रेरणा आहात , तर  मला तुम्हाला काही विचारायचे होते की  आयुष्यात यश मिळविण्यासाठी मला काय करावे लागेल आणि यशाची खरी व्याख्या काय आहे?

पंतप्रधान :अपयश स्वीकारायचेच नाही. जे अपयश स्वीकारतात आणि  अपयशाला शरण जातात, त्यांना कधीच यश  मिळत नाही. मात्र जे अपयशातून शिकतात ते शिखरावर पोहोचतात आणि म्हणूनच अपयशाला कधीही घाबरू नये, अपयशातून शिकण्याची जिद्द असली पाहिजे आणि जो अपयशातून शिकतो तो शिखरावर पोहचतोच.

सहभागी : सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की मी ऐकले आहे की तुम्हाला केवळ तीन ते चार तासांची विश्रांती मिळते , मग  तुम्हाला या वयात प्रोत्साहन आणि ताकद कोठून मिळते?

पंतप्रधान : आता हा एक कठीण  प्रश्न आहे, जेव्हा मी तुमच्यासारख्या युवकांना  भेटतो तेव्हा मला ऊर्जा मिळते, जेव्हा मी तुम्हा सर्वांना पाहतो तेव्हा मला प्रेरणा मिळते, कधी:कधी मी  देशातील शेतकऱ्यांची आठवण काढतो  तेव्हा वाटते की ते किती तास काम करतात. देशाच्या सैनिकांची आठवण काढतो तेव्हा वाटते  ते किती तास सीमेवर उभे असतात. म्हणजेच प्रत्येकजण खूप कष्ट  आणि खूप मेहनत करतो, जर आपण त्यांच्याकडे थोडेसे पाहिले, त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न केला, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला देखील असे वाटते की आपल्याला देखील झोपण्याचा अधिकार नाही, विश्रांती घेण्याचा अधिकार नाही. ते आपले कर्तव्य बजावण्यासाठी इतकी मेहनत घेतात, तसेच  140 कोटी देशवासीयांनी मलाही कर्तव्य बजावयाला दिले आहे. बरं, घरी जाऊन पहाटे 4 वाजता उठायचं ठरवलं आहे असे किती जण आहेत? आता 4 वाजता उठावे लागते  की  उठवावे लागते ?

सहभागी  : उठावे लागते सर.

पंतप्रधान : नाही नाही, आता कोणीतरी शिट्टी वाजवत असेल, हो, मग तुम्ही विचार करत असाल, अरे , तो निघून गेला तर  5 मिनिटे काढता येतील. पण पहा लवकर उठण्याची सवय आयुष्यात खूप उपयोगी पडते.आणि मी म्हणू शकतो की तुमच्याप्रमाणे मी देखील एनसीसी कॅडेट होतो, त्यामुळे ही गोष्ट मला इतकी  उपयोगी पडली आहे आतापर्यंत, कारण शिबिरात जायचो तेव्हा खूप लवकर उठावे लागत  होते, त्यामुळे शिस्त देखील आली. मात्र खूप लवकर उठण्याची माझी सवय अजूनही माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे. जग जागे होण्यापूर्वी मी माझी बरीचशी कामे आटोपून घेतो. मित्रांनो, जर तुम्हीही लवकर उठण्याची सवय कायम ठेवली तर ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

सहभागी : मला एकच सांगावेसे वाटते, छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी  स्वराज्यनिर्मिती केली, त्यानंतर कुणी असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत.

पंतप्रधान : आपल्याला शिकायचे आहे, प्रत्येकाकडून शिकायचे आहे.  तुम्हालाही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावे लागेल, तुम्ही इथे काय शिकलात ते सांगू शकाल?

सहभागी : सर इथे, पुढे, वेगवेगळ्या संचालनालयांशी मैत्री करणे, त्यांच्याशी बोलणे, मिसळणे, सर्व काही… म्हणजे संपूर्ण भारत जेव्हा एकत्र येतो…

पंतप्रधान : जसे तुम्ही घरी असता तेव्हा भाजीला हातही लावला नसता, आईशी भांडला असता, आणि इथे मात्र तुम्ही भाजी खायला शिकला असाल,… तुम्हाला असं वाटलं असेल ना की तुमच्या जीवनात काहीतरी नवीन घडतय. तुमच्यात काय नवीन गोष्ट आली आहे. 

सहभागी: प्रत्येक प्रकारचे समायोजन (अॅडजस्टमेंट) करण्यास शिकलो आहोत.

सहभागी : सर, मी मुळात काश्मिरी पंडित कुटुंबातील आहे,  मी आता नववीत शिकत आहे…त्यामुळे मी आजपर्यंत घरातील कोणतेही काम केलेले नाही, कारण जेव्हाही मी घरी असते तेव्हा मला शाळेत जावे लागते.  मग तिथून परत आल्यावर अभ्यास, शिकवणी वगैरे…पण इथे आल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट मी शिकली आहे ती म्हणजे स्वावलंबी असणे, इथली सगळी कामं मी शिकले आहे आणि घरी जाताच आता अभ्यासा सोबत, मी आईला  मदतही करेन.

पंतप्रधान : बघा हं…..तुमची ही ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) तुमच्या आईपर्यंत पोहोचणार आहे… ती सुद्धा बघणार आहे.. तुम्ही पकडल्या जाल.

सहभागी : इथे येऊन मला पहिली गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे, नेहमी आपल्यासोबत घरी राहतात तेच फक्त कुटुंब असते असे नाही. आपले इथे जमलेले लोक, आपले मित्र, आपले वरिष्ठ… यांचे सर्वांचे मिळूनही एक कुटुंब बनते आणि ही एक  गोष्ट माझ्या नेहमी लक्षात राहील आणि इथे येऊन मी ती शिकली आहे.

पंतप्रधान : एक भारत…श्रेष्ठ भारत.

सहभागी: होय सर.

पंतप्रधान : बरं, या 30 दिवसांत असे काही लोक असतील ज्यांना संचलनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली असेल, काही लोकांना ती मिळाली नसेल, बरोबर?  मग तुम्हाला काय वाटतं, काहीतरी वाटतच असेल?

सहभागी : सर, निवड होणे किंवा न होणे ही वेगळी गोष्ट आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणे ही मोठी गोष्ट आहे सर.

पंतप्रधान : हीच सर्वात मोठी गोष्ट आहे, आपली निवड होवो किंवा न होवो पण मी माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  तर एनसीसी आहे ?

सहभागी : होय सर.

पंतप्रधान : मग, आता तुम्हाला  गणवेशात  आनंद मिळतो की सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मजा येते?

सहभागी : दोन्ही.

पंतप्रधान : तुम्ही आता इथे महिनाभरापासून आहात, तर तुम्ही घरी कुटुंबीयांशी दूरदृष्य प्रणाली द्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स)  संवाद साधतच असाल?

सहभागी : होय सर.

पंतप्रधान: मित्रांसोबतही व्हिडिओ कॉन्फरन्स करत असाल ?

सहभागी : होय सर.

पंतप्रधान : तुम्ही हे का करू शकता…तंत्रज्ञान, दुसरे डिजिटल इंडिया, तिसरे विकसित भारत!असे बघा, जगात असे खूप कमी देश आहेत जिथे डेटा इतका स्वस्त आहे आणि म्हणूनच गरीबातला गरीब माणूसही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी सहज बोलू शकतो.  तुमच्यापैकी कितीजण पैशांच्या डिजिटल देवाणघेवाणीसाठी (डिजिटल पेमेंट) UPI वापरता?  व्वा, नवीन पिढी तर सगळेच्या सगळे पैसे खिशात ठेवतच नाही!  तुमच्या आयुष्यात NCCने तुमची खूप सेवा केली.. तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या…मग मला सांगा असे काय मिळाले…. जे आधी नव्हते?

सहभागी : जय हिंद सर…वक्तशीरपणा आणि वेळेचे व्यवस्थापन आणि तिसरे म्हणजे नेतृत्व.

पंतप्रधान: ठीक आहे आणि कुणी तरी सांगा.

सहभागी : सर, एनसीसीने मला सर्वात जास्त काय शिकवले असेल तर ते म्हणजे लोकसेवा…उदाहरणार्थ रक्तदान शिबिरे, आपल्या सभोवताली स्वच्छता राखणे.

पंतप्रधान : असे पहा… माय भारत, मेरा युवा भारत… माय इंडिया, हे व्यासपीठ भारत सरकार चालवत आहे.  आत्तापर्यंत देशातील तीन कोटींहून अधिक तरुण:तरुणींनी यात नावनोंदणी केली आहे आणि आता माय भारतच्या लोकांनी खूप मोठे काम केले आहे, विकसित भारतावर संपूर्ण देशात चर्चा केली आहे, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि निबंध लेखन आयोजित केले आहे.  वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या आणि देशभरातून सुमारे 30 लाख लोकांनी सहभाग घेतला. आता…तुम्ही परत गेल्या नंतर  पहिली ही गोष्ट कराल  का?

सहभागी : होय सर.

पंतप्रधान : माय भारत वर नोंदणी करुन टाका.

सहभागी : होय सर.

पंतप्रधान : तुम्ही NCC मध्ये जे काही शिकलात… कारण NCC काही वर्षे तुमच्यासोबत राहील… पण माय भारतशी तुम्ही आयुष्यभर निगडित राहू शकता.

सहभागी : होय सर.

पंतप्रधान: मग तुम्ही यासाठी काही कराल का?

सहभागी : होय सर.

पंतप्रधान : भारताने येत्या 25 वर्षांचे एक लक्ष्य ठेवले आहे.  तुम्हाला माहीत आहे का ते ध्येय काय आहे ते?  आपले हात वर करा आणि मोठ्याने म्हणा….

सहभागी : विकसित भारत….

पंतप्रधान: आणि मी या ध्येयासाठी कोणत्या वर्षाचा उल्लेख केला आहे?

सहभागी : 2047!

पंतप्रधान : बरं… 2047 हे वर्ष का ठरवलंय?

सहभागी : 100 वर्षे पूर्ण होतील.

पंतप्रधान : कोणाला?

सहभागी : स्वातंत्र्याला.

पंतप्रधान : मोदीजींना ?…. की भारताच्या स्वातंत्र्याला?

सहभागी : 100 वर्षे पूर्ण होतील.

पंतप्रधान: आणि तोपर्यंत आमचे ध्येय काय आहे?

सहभागी : विकसित भारत.

पंतप्रधान : या देशाचा विकास झाला पाहिजे… कोण करणार?

सहभागी : आम्ही करु.

पंतप्रधान : असे तर नाही ना…की सरकार स्थापन कराल… 

सहभागी : नाही सर.

पंतप्रधान : 140 कोटी देशवासीयांनी जर हे ठरवले आणि त्यासाठी काही सकारात्मक केले तर हे काम अवघड नाही.  बघा, आपण आपले कर्तव्य पाळले तरी आपण विकसित भारत घडवण्याची मोठी शक्ती बनू शकतो. आपल्या आईवर खूप प्रेम करतात असे किती जण आहेत? अच्छा…..प्रत्येक जणच करतोय… चांगले आहे! धरणीमातेवर खूप प्रेम करतात असे किती जण आहेत…हं, असेही बरेच लोक आहेत. बरं, मी एका कार्यक्रमाविषयी सांगितले होते…असा कार्यक्रम, ज्यामध्ये आई आणि पृथ्वी माता, दोघांबद्दलही आदर व्यक्त केला जातो : एक पेड मा के नाम…. आईच्या नावाने एक झाड.  आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या आईसोबत एक रोप लावा आणि नेहमी लक्षात ठेवा की हे माझ्या आईच्या नावाचे रोप आहे आणि मी ते कधीच सुकू देणार नाही आणि याचा फायदा सर्वात आधी कोणाला मिळेल…तर तो या पृथ्वी मातेला.

सहभागी : माझे नाव बतामीपी, जिल्हा दिवांगवैली अनिनी, मी  इदु मिश्मी आहे आणि अरुणाचल प्रदेशातून आलो आहे. जेव्हापासून पंतप्रधान मोदी सत्तेवर आले देश वेगाने पुढे जात आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व जणांना माहीतही आहे आणि सर्व पाहात आहेत.

पंतप्रधान : अरूणाचलचे एक वैशिष्ट्य आहे, एक तर आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतात सूर्याचे पहिले किरण जिथे दाखल होते ते आहे आपले अरुणाचल. मात्र, अरुणाचलचे एक वैशिष्ट्य आहे जसे आपण लोक कुठे भेटलो तर राम राम म्हणतो किंवा आपण लोक नमस्ते म्हणतो. अरुणाचलची एक सवय आहे, ते लोक जय हिंद बोलतात, आजपासून माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला विविधता पाहायची असेल, कला पाहायची असेल, तर वेळ काढून अरुणाचल, मिजोराम, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, आसाम, हा संपूर्ण जो आपला अष्ट लक्ष्मीचा भाग आहे, मेघालय, हे इतके सुंदर आहे तुम्ही दोन महिने तीन महिन्यात देखील पाहू शकणार नाहीत इतक्या गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत.

पंतप्रधान : असे कोणते काम तुमच्या युनिटने केले असेल जे एनएसएसच्या ज्या तुकडीत तुम्ही लोक काम करत असाल, जिला सर्व लोक म्हणत आहेत की ही मुले खूप चांगले काम करत आहेत बरे का, हे तरुण देशासाठी काही करणार आहेत, असे काही अनुभव सामाईक कराल?

सहभागी : सर मला असे सांगायचे आहे की!

पंतप्रधान : तुम्ही कुठून आला आहात.

सहभागी : सर माझे नाव अजय मोदी आहे मी झारखंडचा आहे आणि  सर मला असे सांगायचे आहे की आमच्या युनिटने

पंतप्रधान : तुम्ही मोदी आहात की मोती आहात?

सहभागी : मोदी सर.

पंतप्रधान : बरं.

सहभागी : मोदी आहे मी.

पंतप्रधान : म्हणून तुम्ही ओळखले.

सहभागी : यस सर.

पंतप्रधान : सांगा.

सहभागी : सर माझ्या युनिटने सर्वात चांगले काम केले आहे म्हणजे जसे तुम्ही सांगितले की ज्याचे कौतुक करण्यात आले ते होते की सर आमच्या दुमका येथे एक महिरी समुदाय आहे, जो बांबूच्या वस्तू खूपच सुंदर पद्धतीने बनवतो, but त्या ठराविक हंगामातच विकल्या जातात तर आम्ही लोकांनी सर काही अशा लोकांना शोधले जे या प्रकारची कामे करतात आणि त्यांना त्या कारखान्यांसोबत जोडले जे अगरबत्ती बनवतात.

पंतप्रधान : हा अगरबत्ती शब्द कुठून आला आहे, ते खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्ही लोक जरा नक्की पाहा, त्रिपुराची राजधानी आहे तिचे नाव काय आहे.

सहभागी : अगरतळा सर.

पंतप्रधान : त्यात एक शब्द आहे काय आहे आणि आपण कशाविषयी बोलत आहोत.

सहभागी : अगरबत्ती.

पंतप्रधान : तर त्या ठिकाणी अगरची जंगले असतात आणि त्याचा इतका सुगंध असतो की त्याचे तेल खूपच महाग असते. जगात कदाचित खूपच कमी तेले इतकी महाग असतील, त्याचा सुगंध अतिशय उत्तम असतो आणि यातूनच परंपरा निर्माण झाली अगरबत्ती बनवण्याची जिचा सुगंध दरवळत असतो. सरकारचे एक जेम पोर्टल आहे, तुमच्या भागात देखील जर जेम पोर्टलवर आपल्या उत्पादनांची नोंदणी करत असेल, त्याची किंमत वगैरे लिहायची असते, असे होऊ शकते की सरकारला त्या वस्तूंची गरज असेल तर ते तुम्हाला त्याची ऑर्डर देईल. तर खूपच वेगाने याचे काम होत असते, तर कधी तुम्ही लोकांनी, तुमच्यासारखे जे सुशिक्षित तरुण आहेत, त्यांनी लोकांना याची माहिती करून दिली पाहिजे. माझे असे स्वप्न आहे, की देशातील गावांमध्ये जे महिला बचत गट असतात ना, त्यातून तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे स्वप्न आहे. एक कोटी आणि 30 लाखांपर्यंत मी पोहोचलो आहे.

सहभागी : स्वतः माझी आई आहे जी शिवणकाम शिकली आहे आणि आता ते काम करत आहे आणि ती इतकी कुशल आहे की त्या ज्या चणिया असतात, तुम्हाला माहीत असेलच की सर नवरात्र उत्सवात चणियांना किती मागणी असतेत तर या चणिया त्यांनी बनवल्या आहेत, ज्या परदेशात देखील जातात.

पंतप्रधान : खूपच छान.

सहभागी :  तर असेच एक उदाहरण तुम्ही स्थापित केले आहे आणि पुढे विकसित भारतात लखपती दीदी हा जो कार्यक्रम आहे तो एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो सर.

पंतप्रधान : तर तुमच्यासोबत परदेशातील तुकडी देखील दिसत आहे, मग असे किती लोक आहेत ज्यांनी परदेशातील मित्रांसोबत घट्ट मैत्री केली आहे! बरं हे लोक जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा ते कोणते प्रश्न विचारतात, तर भारताविषयी त्यांना काय जाणून घ्यायचे आहे, ते काय विचारतात?

सहभागी: सर ते भारतीय संस्कृतीविषयी विचारतील नंतर परंपरा आणि धर्म आणि राजकारण याविषयी विचारतात .

पंतप्रधान: हम्म politics also, ओह.

सहभागी: नमस्ते सर, मी नेपाळची रोजिना बान आहे. भारताला भेट देण्याची आम्हाला खूपच उत्सुकता होती आणि तुम्हाला भेटण्याची देखील उत्सुकता होती आणि मी तुमची खूप आभारी आहे आणि तुमच्या आदरातिथ्याबद्दल, मनापासून केलेल्या आदरातिथ्याबद्दल मी अतिशय आभारी आहे.

सहभागी: आम्ही निघण्याच्या पूर्व संध्येला मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्तांनी आमची भेट घेतली. त्यांनी आम्हाला भारताला भेट द्यायला सांगितले, हे तुमचे दुसरे घर आहे, असे म्हणाले ते अतिशय योग्यच आहे..

पंतप्रधान : Wow.

सहभागी: आम्हाला आमच्या घरी असल्यासारखेच वाटत आहे आणि त्याबद्दल आणि मॉरिशस आणि भारतामधील या बंधुभावाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. हे सहकार्य आणि भारत आणि मॉरिशस यांच्यातील बंधुभावाचे नाते चिरायू होऊ दे.

पंतप्रधान : हे तुमचे दुसरे घर तर आहेच पण तुमच्या पूर्वजांचे हे पहिले घर आहे.

सहभागी : Yes, Indeed!.

सहभागी : केसरिया ……..पधारो म्हारे देश

पंतप्रधान : शाब्बास!

सहभागी : सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा, हम बुलबुले हैं इसके, ये गुलसितां हमारा हमारा सारे जहां से अच्छा।

पंतप्रधान : खूप:खूप अभिनंदन भाऊ.

सहभागी: धन्यवाद सर.

पंतप्रधान: खूप खूप धन्यवाद जी, खूप खूप धन्यवाद.

 

* * *

S.Kakade/S.Patil/JPS/Sushama/Ashutosh/Shailesh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai