Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘प्रगती’द्वारे पंतप्रधानांनी साधलेला संवाद

‘प्रगती’द्वारे पंतप्रधानांनी साधलेला संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘प्रगती’या ICT वर आधारीत स्वयंप्रेरित सुशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी यासाठीच्या ‘प्रगती’ या बहुआयामी मंचाद्वारे 19वा संवाद साधला.

टपाल सेवांशी निगडीत हाताळणी आणि तक्रारींचे निवारण यासंदर्भातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. टपाल सेवेचे महत्व पुन्हा वाढीला लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टपाल खात्याची कार्यप्रणालीत कोणते बदल करण्यात आले आहेत, तसेच त्रुटींबद्दल जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबद्दल पंतप्रधानांनी जाणून घेतले. टपाल खात्यातील पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण, काळजीपूर्वक केलेल्या सुधारणा आणि मनुष्यबळ विकास व्यवस्थापन यावर पंतप्रधानांनी भर दिला.

हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, ओदिशा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला.

‘गुन्हा आणि गुन्हेगार मागोवा जाळे आणि प्रणाली’ अर्थात CCTNS चाही पंतप्रधानांनी सर्वंकष आढावा घेतला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी या जाळ्याला राज्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्यास सर्वाधिक फायदा होऊ शकेल, असे त्यांनी सुचवले.

B.Gokhale/J.Patankar/D.Rane