Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान टेकनपूरमध्ये


पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मध्य प्रदेश मधला टेकनपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या अकादमीत आज आगमन झाले.

आज दिवसभर परिषदेत सुरक्षेशी निगडीत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच सादरीकरणही करण्यात आले. गेल्या तीन वर्षात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणी संदर्भातही सादरीकरण करण्यात आले.

भोजनाच्या वेळी पंतप्रधानांनी विशिष्ट सुरक्षा आणि पोलिस कार्यासंबंधी निवडक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी 9 तासांहून अधिक काळ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

टेकनपूर येथे आगमन झाल्यानंतर, पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दल अकादमीच्या पाच नवीन इमारतींचे उद्‌घाटन केले.

या परिषदेत उद्याही चर्चा सुरु राहणार आहे. नवी दिल्लीला प्रयाण करण्यापूर्वी पंतप्रधान समारोप समारंभाला संबोधित करतील.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha