पोलावरम प्रकल्पातल्या सिंचन विषयक घटक आणि बाह्य मदत प्रकल्पाना निधीपुरवठा करण्यात विशेष सूट देऊन आंध्र प्रदेशासाठी विशेष सहाय्य उपाययोजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
2015 -16 ते 2019 -20 या काळात केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र आणि राज्य यांच्यात
90 :10 या प्रमाणात निधीपुरवठा केलेला असल्यास, आंध्र प्रदेशासाठी, केंद्र सरकार विशेष मदत उपाययोजना पुरवेल. 2015-2016 ते 2019-20 या काळात राज्यसरकारने स्वाक्षरी आणि वितरित केलेल्या बाह्य मदतीच्या प्रकल्पांचे कर्ज आणि व्याजाची परतफेड करून त्या भरपाईद्वारे ही विशेष मदत देण्यात येईल. पोलावरम प्रकल्पाच्या सिंचनविषयक घटकाच्या उर्वरित खर्चासाठी 100% निधीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे आंध्र प्रदेश मधून दुसऱ्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर राहिलेल्या आंध्र प्रदेशच्या आर्थिक भरभराटीला चालना मिळणार असून राज्याचा आर्थिक पाया भक्कम व्हायला मदत होणार आहे. पोलावरम प्रकल्पाला केंद्रीय निधी पुरवठा केल्याने हा प्रकल्प लवकर पूर्णत्वाला जाऊन राज्यात सिंचन क्षमता वाढून पर्यायाने जनतेला मोठी मदत होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha