Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स देशांच्या आगामी भेटीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे निवेदन


पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी उद्या शनिवारी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावर असून विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या उद्देश्याने ही भेट असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

२४ जून २०१७ ला मी पोर्तुगालला कार्य भेट देण्यासाठी जात आहे. जानेवारी २०१७ मध्ये महामहीम पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांच्या भारत भेटीनंतर आमच्यातील निकटचे ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक गतिमान झाले आहेत.

पंतप्रधान कोस्टा यांच्याशी होणाऱ्या भेटीकडे मी उत्सुकतेने पाहत आहे. नुकत्याच झालेल्या आमच्या ताज्या चर्चेच्या आधारावर आम्ही विविध संयुक्त उपक्रम आणि निर्णयांच्या प्रगतीचा फेर आढावा घेणार आहोत. विशेषतः आर्थिक सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ सहकार्य आणि दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध या क्षेत्रांत द्विपक्षीय प्रतिबद्धता आणखी वाढवण्याच्या उपायांवर आम्ही चर्चा करणार आहोत.

दहशतवाद विरोधी आणि परस्परांच्या हिताच्या आंतरराष्ट्रीय विषयांवर सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या साधनांवर आम्ही विचार करणार आहोत. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक सखोल होण्याची क्षमता मी पाहतो.

या भेटी दरम्यान पोर्तुगालमधील भारतीय समुदायाशी संवाद साधण्यासही मी उत्सुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

२४ ते २६ जून दरम्यान पंतप्रधान वॉशिंग्टन डी. सी. ला भेट देतील.

अध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून मी २४ ते २६ जून या दरम्यान वॉशिंग्टन डी. सी. ला भेट देणार आहे. या आधी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह दूरध्वनीवर माझी चर्चा झाली आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांच्या परस्पर हितासाठी सर्वांगीण फलदायी प्रतिबद्धता आणखी पुढे नेण्याच्या सामायिक उद्देश्यला आम्ही चर्चेत स्पर्श केला आहे. भारत आणि संयुक्त राज्ये यांच्यातील मजबूत आणि व्यापक भागीदारी आणखी घट्ट करण्यासाठी आपापल्या दृष्टिकोणांची विस्तृत देवाणघेवाण करण्यासाठी मी या संधीकडे पाहत आहे.

संयुक्त राज्यांबरोबर भारताची भागीदारी बहुस्तरीय आणि वैविध्यपूर्ण असून केवळ दोन्ही सरकारांचा नव्हे तर उभय बाजूंच्या सर्व भागधारकांनी तिला समर्थन दिले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्या अधिपत्याखालील नवीन प्रशासनाबरोबर आमच्या भागीदारीसाठी प्रागतिक दृष्टीकोण उभारण्याकडे मी पाहत आहे.

अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांबरोबर अधिकृत बैठकांशिवाय मी काही अमेरिकन नामवंत सीईओंनाही भेटणार आहे. पूर्वीप्रमाणेच आताही संयुक्त राज्यातील भारतीय मंडळीशी मी संवाद साधणार आहे.

२७ जून २०१७ रोजी पंतप्रधानांची नेदरलँड ला भेट.

मी २७ जून २०१७ ला नेदरलँड्सलाही भेट देणार आहे. या वर्षी भारत – डच राजनैतिक संबंध स्थापित होण्याची सत्तरी आपण साजरी करत आहोत. या भेटीदरम्यान माझी डच पंतप्रधान महामहीम श्री. मार्क रुट यांच्याशी अधिकृत बैठक होणार आहे. नेदरलँड्सचे राजे विलियम अलेक्झांडर यांची भेट घेणार असून राणी मॅक्झिमा यांना भेटणार आहे.

पंतप्रधान रुट यांच्याशी होणाऱ्या भेटीकडे मी उत्सुकतेने पाहत असून आमच्या द्विपक्षीय संबंधांचा फेर आढावा घेतला जाईल. दहशतवादाचा मुकाबला आणि हवामान बदल यासह महत्वाच्या जागतिक मुद्द्यांवर मी पंतप्रधान रुट यांच्याबरोबर बैठकीत एकमेकांच्या मतांची देवाणघेवाण करणार आहे.

आमच्या द्विपक्षीय संबंधांचा गाभा आर्थिक संबंध आहेत. नेदरलँड्स हा आमचा जगातील पाचव्या क्रमांकाचा आणि युरोपातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी गुंतवणूक भागीदार देश आहे. पाणी आणि कचरा व्यवस्थापन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, अपारंपरिक उर्जा व बंदरे आणि नौकानयन या क्षेत्रांतील डचांचे विशेष कौशल्य आमच्या विकासाच्या गरजांना अनुरूप आहे.

भारत – डच आर्थिक प्रतिबद्धता ‘विन विन’ अशा प्रकारची आहे. हा मेळ आणखी पुढे नेता येईल यासाठी उभय बाजूंनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे याबाबत मी पंतप्रधान रुट यांच्याशी चर्चा करेन. प्रमुख डच कंपन्यांच्या सीईओना मी भेटणार असून भारताच्या विकासाच्या कहाणीत सहभागी होण्याचे त्यांना आवाहन करणार आहे.

युरोपात राहणाऱ्या भारतीयांपैकी मोठ्या संख्येने भारतीय नेदरलँड्समध्ये सुद्धा राहत असून दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये निकटचे संबंध आहेत. नेदरलँड्समधील या भारतीय समुदायाला प्रतिबद्ध करण्याकडे मी आशेने पाहतो.

पी.आई.बी. /बी. गोखले/ यू.कुलकर्णी