Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये आर2 महिला 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


 

पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी  भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

अवनी लेखरा ही पॅरालिम्पिक्समध्ये तीन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली असून  तिने इतिहास घडवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान आपल्या X वरील संदेशात म्हणाले,

भारताने #Paralympics2024 मध्ये पदकांचे खाते उघडले!

अभिनंदन @AvaniLekhara आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल. पॅरालिम्पिक्समध्ये तीन पदके जिंकून पहिली भारतीय महिला क्रीडापटू बनण्याचा इतिहास तिने घडवला आहे!  तिच्या समर्पित वृत्तीचा भारताला अभिमान वाटतो आहे. #Cheer4Bharat”

***

N.Chitale/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com