नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025
आजच्या चर्चेतून एक गोष्ट समोर आली आहे – सर्व हितधारकांमध्ये दृष्टिकोन आणि उद्देशांमध्ये एकवाक्यता आहे.
“एआय फाउंडेशन” आणि “सस्टेनेबल एआय कौन्सिल” स्थापन करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.या उपक्रमांसाठी मी फ्रान्सचे अध्यक्ष आणि माझे प्रिय मित्र मॅक्रॉन यांचे अभिनंदन करतो आणि आमच्याकडून पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन देतो.
आपण “एआय साठी जागतिक भागीदारी” खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूपाची बनवली पाहिजे. त्यामध्ये ग्लोबल साउथ आणि त्यांचे प्राधान्यक्रम, चिंता आणि गरजा अधिक समावेशक बनवलेल्या असाव्यात.
या कृती शिखर परिषदेची गती वाढवण्यासाठी, भारताला पुढील शिखर परिषदेचे यजमानपद भूषवायला आवडेल.
धन्यवाद.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai