Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरा आशियाई-2018 क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या क्रीडापटूंचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव


पॅरा आशियाई-2018 क्रीडा स्पर्धेमध्ये पदक विजेत्या क्रीडापटूंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या सर्व गुणी खेळाडूंचा पंतप्रधानांनी सत्कार केला.

देशासाठी या खेळाडूंनी पदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या खेळाडूंची मानसिक शक्ती चांगली सुदृढ असल्यामुळेच त्यांना हे स्पर्धेमध्ये यश मिळू शकले आहे. अनेक पदकांची कमाई करून या खेळाडूंनी संपूर्ण जगामध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचेही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

क्रीडापटूंनी आपल्यातली जिंकण्याची वृत्ती आधीच कायम ठेवावी, ती वाढवावी आणि भविष्यात यशाचे यापेक्षाही उंच शिखर गाठण्याची जिद्द मनाशी बाळगावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

N.Sapre/S.Bedekar/P.Kor