Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे कौतुक केले आहे. पॅरिस येथे पार पडलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये 29 पदके जिंकणाऱ्या  देशाच्या पॅरा-ॲथलीट्सच्या अतूट समर्पण आणि अदम्य इच्छाशक्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे .
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“पॅरालिम्पिक 2024 खास आणि ऐतिहासिक ठरले आहे .
आपल्या  अतुलनीय पॅरा-ॲथलीट्सनी देशासाठी 29 पदके जिंकल्याचा  भारताला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेत  भारताने  पदार्पण केल्यानंतर आतापर्यंतची  ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
आपल्या  खेळाडूंच्या अतूट  समर्पण आणि अदम्य इच्छाशक्तीमुळे हे यश मिळाले आहे. स्पर्धेतील त्यांच्या या कामगिरीने आपल्याला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत तसेच उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरित केले आहे.
#Cheer4Bharat”

***
JPS/Sushama kane